PHOTOS

मागील 5 वर्षात भारतातील 'या' Railway स्टेशनवर थांबली नाही एकही ट्रेन; कारण...

ts: भारतात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथं मागील पाच वर्षात एकही ट्रेन थांबली नाही, असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा यावर विश्वास बसेल का? ...

Advertisement
1/8

मागील पाच वर्षात इथं एकही ट्रेन थांबलेली नाही असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. मात्र हे खरं आहे. जाणून घेऊयात या स्थानकाबद्दल...

2/8

रेल्वे मार्गांच्या लांबीचा विचार केल्यास भारत हा आशिया खंडातील सर्वाधिक रेल्वे मार्ग असलेला दुसऱ्या क्रमांकाचा आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे.

 

3/8

भारतात एकूण 8 हजार रेल्वे स्थानकं आहेत. यापैकी वेगवेगवळी रेल्वे स्थानकं वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध आहेत. अनेक रेल्वे स्थानकांची नावं, इतिहास आणि त्यासंदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी लक्ष वेधून घेतात. मात्र भारतात एक असंही रेल्वे स्थानक आहे जिथे मागील पाच वर्षांपासून एकही ट्रेन थांबलेली नाही.

 

4/8

स्वस्त प्रवासासाठी अनेकजण रेल्वेला प्राधान्य देतात. देशभरामध्ये रोज 13 हजारहून अधिक ट्रेन्सच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होते. रोज लाखो लोक भारतीय रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रोज मोठ्या प्रमाणात मालवाहतुकही होते.

 

5/8

शहराचा आकार, त्याचं महत्त्वं, तेथे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची संख्या या साऱ्या गोष्टींचा विचार करुन वेगवेगळ्या मार्गांवर वेगवेगळे थांबे दिले जातात. मात्र देशात असं एक स्थानक आहे जिथे कोणत्या ट्रेनला मागील पाच वर्षांपासून थांबाच देण्यात आलेला नाही.

6/8

ज्या रेल्वे स्थानकावर मागील पाच वर्षात एकही ट्रेन थांबलेली नाही, त्याचं नाव आहे कोहदाड! पाच वर्षांपूर्वी या रेल्वे स्थानकावर लोकांची खचाखच गर्दी असायची. अगदी मुंबईतील दादर स्थानकावर असते तशी म्हणा हवं तर. मात्र आता हे स्टेशन जवळपास निर्मनुष्य असतं.

 

7/8

हे रेल्वे स्थानक मध्य प्रदेशमधील खंडवा शहरापासून काही अंतरावर आहे. कोरोनाच्या आधी या स्टेशनवरुन रोज शेकडोच्या संख्येनं प्रवासी कटनी-भुसावळ मार्गावरील पॅसेंजर ट्रेन पकडून प्रवास करायचे. मात्र आता या स्थानकावर स्माशान शांतता असते.

 

8/8

भारतीय रेल्वेने कटनी-भुसावळ पॅसेंजर ट्रेनला एक्सप्रेस ट्रेनचा दर्जा दिला आहे. त्यामुळे ही ट्रेन या स्थानकावर तांबत नाही. भारतामधील हे असं एकमेव स्थानक आहे जिथे मागील पाच वर्षांपासून एकही ट्रेन थांबलेली नाही. (गॅलरीमधील अनेक फोटो प्रातिनिधिक आहेत.)

 





Read More