भारतात पर्यटनाकडे असणारा कल पाहता काही महत्त्वाच्या ठिकाणांवर किफायतशीर दरात फिरण्याती संधी IRCTC कडून दिली जाते. हासुद्धा त्यातलाच एक बेत.
IRCTC Vaishno Devi Tour Package : देशातील अनेक देवस्थळांना भेट देण्याकडे अनेकांचाच कल असतो. काही कुटुंबांमध्ये तर दरवर्षी सहकुटुंब एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचा अलिखित नियमच असतो. कौटुंबीक भेटीगाठी, फिरण्यासोबतच यानिमित्तानं देवदर्शनही पार पडतं.
तुम्हीही असाच बेत आखत असाल तर, आयआरसीटीसी इथं तुमच्यासाठी एक कमाल बेत घेऊन आलं आगे. जिथं तुम्हाला वैष्णो देवी, पटनीटॉप भागाला भेट देता येणार आहे.
बरं, इथं जाण्यासाठी तुम्हाला शक्य असेल त्या तारखांना हा बेत ठरवता येऊ शकणार आहे. ज्यासाठी 14 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. 5 दिवस आणि 6 रात्री अशा कालावधीसाठी हा प्रवास असणार आहे.
मुंबई- कटरा- वैष्णो देवी- पटनीटॉप- मुंबई असा हा प्रवास असेल. ज्यासाठी मुंबईहून दर शुक्रवारी प्रवास सुरु होईल. 3 टियर एसी डब्यातून या प्रवासाची मुभा असेल.
आयआरसीटीसीच्या पॅकेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार यामध्ये एका व्यक्तीसाठी 22900 रुपये, दोन व्यक्ती असल्यास 14500 रुपये आणि तीन व्यक्ती एकत्र प्रवास करत असल्यास 14000 रुपये इतकी रक्कम आकारली जाणार आहे.
वरील किंमतीमध्ये परतीच्या प्रवासासह तिकीट खर्च, रेल्वे स्थानकावरून हॉटेलपर्यंतचा बसप्रवास, कटरा ते पटनीटॉप प्रवास, 3 ब्रेकफास्ट आणि 3 रात्रीची जेवणं, कटरा येथील हॉटेल मुक्काम, प्रवास विमा आणि इतर कर समाविष्ट असतील.
रेल्वेची वाढील भाडेवाढ, सेवाशुल्क, प्रवासादरम्यानचं जेवण, प्रवेश तिकीटं, मुक्काम ठिकाणी सेवाशुल्क या आणि अशा इतर गोष्टींची रक्कम वरील खर्चामध्ये समाविष्ट नाही. या प्रवासाविषयीच्या सविस्तर माहितीसाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून मिळवू शकता.