our Plan: भारतात रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलं असून भारतातील जवळपास प्रत्येक महत्वाची आणि लहानसहान ठिकाण ही रेल्वे मार्ग...
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण फिरण्याची प्लॅनिंग करतात. निसर्गसौंदर्याने नटलेली ठिकाण फिरण्यास लोकांना फार आवडत. अनेक हिल स्टेशनवर लोकांची गर्दी वाढू लागते. त्यामुळे फिरण्यासह तेथे खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा वाढतो. जर तुम्ही सुद्धा या सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा प्लॅन करत असाल तर IRCTC ने तुमच्या करता एक जबरदस्त टूर प्लॅन आणला आहे. ज्यामुळे तुमच्या खिशावर जास्त भर सुद्धा येणार नाही आणि बस टॅक्सी बुक करण्याची टेन्शन नाही. 10000 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत हिल स्टेशन फिरण्याचा एक जबरदस्त टूर प्लॅन IRCTCने लाँच केलाय.
उन्हाळ्यात IRCTC ने ऊटीचे टूर पॅकेज लाँच केला आहे. ज्यात तुम्ही 4 रात्र आणि 5 दिवस ऊटीचं निसर्ग सौंदर्य आणि तेथील खास गोष्टींचा आनंद घेऊ शकता.
IRCTC च्या या टूरमध्ये मुदुमलाई आणि कुन्नूर सारख्या ठिकाणी फिरण्याची संधी मिळेल. ही ठिकाणे आपल्याला उन्हाळ्यात वेगळाच आनंद देतील. या उन्हाळ्यात आपण कमी पैशात भारतातील एक सुंदर हिल स्टेशन फिरण्याचा आनंद घेऊ शकता. चार रात्री आणि पाच दिवसांचे हे पॅकेज चेन्नईपासून सुरू होईल.
या पॅकेज अंतर्गत, आपण 12671 नीलगिरी एक्सप्रेसद्वारे प्रवास करून मेटटूपलायमला पोहोचाल. तेथून पुढची टूर ही रस्ते मार्गाने सुरु होईल.
ऊटीला गेल्यावर तेथे तुमच्या राहण्यासाठी हॉटेलचा बंदोबस्त केलेला असेल. येथून तुम्हाला डोड्डाबेट्टा पीक, चहाचं म्यूजियम, ऊटी धबधबा आणि बोटॅनिकल इत्यादी फिरवले जाते. मुदुमलाई वाइल्ड लाइफ सेंच्युरी, मुदुमलाईमध्ये एलिफंट कॅम्प, जंगल राईड सुद्धा या टूर पॅकेजचा भाग असतील.
ऊटीमधून चेकआउट केल्यावर तुम्हाला कुन्नूरमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये फिरवण्यात येईल. इथून तुम्हाला मेट्टुपलयम रेल्वे स्टेशनला घेऊन जाण्यात येईल. जिथून चेन्नईसाठी ट्रेन असेल.
सदर टूर पॅकेजसाठी प्रति व्यक्ती 9050 रुपये खर्च येईल. जर तुम्हाला सिंगल रूम हवा असेल तर त्यासाठी 24385 रुपये खर्च येईल. जर दोन लोकांसोबत रूम शेअर करणार असाल तर 12700 रुपये खर्च येईल. तसेच जर तीन लोकांमध्ये रूम शेअर करणार असाल तर 9650 रुपये इतका खर्च येईल. जर तुमच्या सोबत लहान मुलं असेल तर त्यासाठी वेगळा खर्च करावा लागेल. लहान मुलांच्या बेडसह बुकिंग खर्च 4930 रुपये असेल.