भारतीय रेल्वे जगातील सर्वात चौथे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात.
रेल्वे तिकीटात प्रवाशांना ट्रेनमध्ये फक्त सीटच नव्हे तर अनेक सुविधादेखील मिळतात. RAC तिकीट असलेल्या प्रवाशांनाही एक खास सुविधा मिळते. जाणून घेऊया रेल्वे काय सुविधा देते.
रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वे प्रवाशांना काय सुविधा देते हे आज आपण जाणून घेऊया.
RAC तिकीटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण सीट मिळत नाही त्यांना सीट शेअर करावी लागते.
RAC प्रवाशांनादेखील एका खास सुविधा मिळते. ही सुविधा म्हणजे बेडरोल किट (चादर आणि ब्लँकेट) ही आहे.
रेल्वे बोर्डानुसार, AC क्लासमध्ये RAC प्रवाशांनादेखील संपूर्ण बेडरोल किट देण्यात येतो.
रेल्वे बोर्डाच्या पत्रात म्हटलं आहे की, एसी क्लासमध्ये आरएसी प्रवाशांना बेडरोलचे भाडेदेखील आकारण्यात येत आहे. त्यामुळं त्यांना बेडरोल किट देण्यात येतो.
रेल्वे बोर्डानुसार हा नियम याआधीही होता. पण आता पुन्हा एकदा हा नियम सक्तीने पाळला जात आहे.