देशभरात मोठ्या प्रमाणात भारतीय रेल्वेचे जाळे पसरले आहे. गरिबांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच रेल्वेचा प्रवास परवडतो. मात्र, तुम्हाला हे माहितीये का रेल्वेमधून काही सामान नेण्यास काही नियमांचे पालन करावे लागते.
विमान प्रवास करताना मर्यादित स्वरुपातच सामान नेता येते. मात्र, रेल्वेमध्ये तुम्ही कितीही सामान नेऊ शकता. विमानाच्या तुलनेत रेल्वेत सामान नेण्याचे नियम तितकेचे कठोर नाहीत. मात्र रेल्वेतही काही सामान नेण्यास काही बंधने आहेत.
रेल्वेत कोणतं सामान न्यावे व कोणते नाही याबाबत रेल्वेने काही नियम सांगितले आहेत. ट्रेन अपघात रोखण्यासाठी रेल्वेने काही नियम सांगितले आहे. त्यानुसार ट्रेनमध्ये काही ज्वलनशील पदार्थ नेण्यास पूर्णपणे बंदी आहे.
रेल्वेने प्रवाशांना इशारा देत म्हटलं आहे की, ट्रेनमध्ये प्रवास करत असताना स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थसोबत नेण्यास बंदी आहेत. यामुळं ते स्वतःबरोबरच प्रवाशांचाही जीव धोक्यात घालू शकतात.
रेल्वेने म्हटलं आहे की, प्रवास करत असताना जर तुम्ही अशाप्रकारे धोकादायक वस्तू घेऊन जात असाल तर तुम्हाला तुरुंगाची हवा खावी लागू शकते.
रेल्वेने याबाबत ट्विटदेखील केली आहे. स्फोटक आणि धोकादायक साहित्य जसं की, फटाके, गॅस सिलेंडर आणि गन पावडर नेण्यास बंदी आहे. त्याचबरोबर केरोसीन, पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थही तुम्ही नेऊ शकत नाही.
रेल्वेने म्हटलं आहे की, प्रवाशांना रेल्वेमध्ये लायटर पेटवणेही वर्ज्य आहे. प्रवाशांना ट्रेनमध्ये वा स्थानकात धुम्रपान करण्यास बंदी आहे. ट्रेनमधून लायटर नेल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
रेल्वेने इशारा देत म्हटलं आहे की, जर तुम्ही ट्रेनमधून ज्वलनशील व स्फोटक पदार्थ घेऊन जात असाल तर रेल्वे अॅक्ट 1989च्या सेक्शन 164 आणि 165अंतर्गंत हजार रुपयांचा दंड भरावा लागेल किंवा 3 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो.