Indian Railway : रेल्वेनं गाठा दुसरा देश... जाणून घ्या देशातील अशा विमानतळांची नावं जिथं जाण्यासाठी रेल्वे तिकीटासमवेत पासपोर्ट आणि व्हिसाही लागतो.
Indian Railway : दर दिवशी असंख्य प्रवाशांना अपेक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी भारतीय रेल्वेकडून देशाच्या विविध भागांमध्ये रेल्वेसेवा पुरवली जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण भारतीय रेल्वेची ही सेवा परदेशापर्यंत आहे बरं.
विमानानं प्रवास करण्याची भीती वाटणाऱ्यांना किंवा विमानाच्या तिकीटाचा खर्च न परवडणाऱ्या आणि तरीही परदेशवारी करण्याची इच्छा असणाऱ्या मंडळींना भारतीय रेल्वेच्या वतीनं ही एक कमाल संधी दिली जाते ती म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याची.
रेल्वेच्या या सुविधेमुळं प्रवाशांना किमान खर्चात परदेशवारीचा आनंद मिळतो. त्यातलं एक रेल्वे स्थानक आहे. पेट्रापोल. पश्चिम बंगालच्या सीमेवर असणाऱ्या या रेल्वे स्थानकावरून तुम्हाला परदेश गाठता येतो.
इंडो बांगलादेश सीमेवर ट्रान्झिट हबमध्ये तयार करण्यात आलेल्या या स्थानकाला ब्रॉड गेज लाईननं बांगलादेशमधील खुलना येथे जोडण्यात आलं आहे.
बांगलादेश गाठण्यासाठी प्रवाशांना व्हिसा आणि पासपोर्ट अनिवार्य असतो. त्याचप्रमाणं पश्चिम बंगालमधील राधिकापूर रेल्वे स्थानकावून निघणारी रेल्वेही तुम्हाला परदेशात पोहोचवते. तिथंही ही पासपोर्टची अट लागू बरंका.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा जोडणारं रेल्वे स्थानक म्हणजे, अटारी. या रेल्वे स्थानकावरून पाकिस्तानसाठी समझौता एक्स्प्रेस चालवली जाते. पण, 2019 पासून ही रेल्वे भारताच्या वतीनं थांबवण्यात आली. असं असलं तरीही या रेल्वेनं प्रवास करतानासुद्धा व्हिसा आणि पासपोर्टची पूर्तता करणं गरजेचं होतं.
जयनगर, बिहारच्या सीमेवर असणाऱ्या या रेल्वे स्थानकातून तुम्ही नेपाळ रोखानं प्रवास करु शकता. हे एक टर्मिनल रेल्वे स्थानक आहे, जिथून 39 रेल्वे धावतात. इथून निघणाऱी रेल्वे नेपाळमध्ये कुर्था रेल्वे स्थानकापर्यंत प्रवाशांना सोडते.