Indian Railway : इथून पुढं मात्र रेल्वे विभागाच्या एका अभिनव उपक्रमामुळं ही अडचणही दूर होणार आहे.
How to Book Confirm Train Ticket: भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दर दिवशी देशात जवळपास 2 कोटींहून अधिक नागरिक प्रवास करत अपेक्षित ठिकाणी पोहोचतात.
दर दिवशी हजारोंच्या संख्येनं विविध मार्गांवर रेल्वे धावतात. काही मार्गांवर तर रेल्वेला इतकी गर्दी असते की, तिकीटाचं आरक्षण कितीही लवकर करण्याचा प्रयत्न करुही Confirm Ticket मिळवणं शक्य होत नाही.
प्रवाशांपुढं येणारी ही आव्हानं कमी करण्यासाठी आता रेल्वेच्याच वतीनं एक सुपर प्लॅन तयार करण्यात आला आहे. जिथं अधिकाधिक प्रवाशांना रेल्वेचं कन्फर्म तिकीट मिळू शकणार आहे.
प्राथमिक माहितीनुसार रेल्वेचा हा उपक्रम यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात काही निवडक मार्गांवर या प्लॅनची चाचणी करण्यात येणार असून, साधारण 90 टक्के प्रवासी याअंतर्गत कन्फर्म तिकीट मिळवण्यास पात्र असतील.
हा उपक्रम म्हणजे रेल्वेचं सुपर अॅप. या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार असून, या माध्यमातून डेटा अॅनालिसिसच्या माध्यमातून रेल्वे तिकीटाची उपलब्धता वाढवता येणार आहे.
500 किमी आणि त्याहून कमी अंतराच्या मार्गांवरील कन्फर्म तिकिटाच्या प्रवाशांचा डेटा आणि वेटिंग तिकिटांचा डेटा यांचं अॅनालिसिस करण्यात येणार असून, प्रवाशांची मागणी आणि आसनक्षमता यानुसार आरक्षणाची आकडेवारी निर्धारित केली जाईल.
2031 - 32 या वर्षांदरम्यान प्रवाशांमागं असणारी वेटिंग लिस्टची कटकट संपवण्यासाठी आणि सुखद प्रवासाचा अनुभव देण्यासाठी रेल्वे विभागाकडून हे प्रयत्न करण्यात येत आहेत. तेव्हा आगा मागणी, पुरवठा आणि उपलब्धता या त्रिसूत्रीवर आधारित रेल्वेचा हा प्रयोग नेमका कितपत यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.