रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे विभागानं एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळं प्रवाशांना आता तिकिट नसतानाही प्रवास करता येणं सहज शक्य असणार आहे. आहे की नाही गंमत?
Indian Railway : रेल्वेनं प्रवास करतेवेळी अनावधानानं तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि काही कारणास्तव दंडही भरावा लागला तर तुम्ही डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे देऊ शकता. शिवाय कार्डनेच पैसे भरूनही तुम्ही तिकिट काढू शकता.
बऱ्याचदा प्रवाशांना Confirm Ticket मिळत नाही. किंवा अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठीचं तिकीट मिळत नाही. अशावेळी रोख रकमेपेक्षा प्रवाशांकडून होणारा व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेही शक्य होणार आहे.
रेल्वेमध्येही 4G चा वापर वाढवण्यात येणार आहे. यामध्ये अधिकाऱ्यांकडे पॉइंट ऑफ सेलिंग म्हणजेच पीओएस मशीन्समध्ये 2G सिमकार्ड आहेत. पण, यामुळं दूरवरच्या भागांमध्ये मात्र नेटवर्कच्या अडचणी येतात. पण, आता मात्र अद्ययावर सुविधांमुळे चिंता करण्याची गरज नाही.
तुमच्याकडे तिकिट नाही, पण तरीही रेल्वेनं प्रवास करायचा आहे तर अशा परिस्थितीत तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट (Platform ticket) काढून ट्रेनमध्ये चढू शकता.
रेल्वेमध्ये (railway) येणाऱ्या तिकिट चेकरकडूनही तुम्ही तिकिट काढू शकता. यामध्ये तुम्ही ज्या स्थानकावर ट्रेनमध्ये चढता त्या स्थानकापासूनचं तिकिट काढण्यात येईल.