PHOTOS

प्रवाशांनो लक्ष द्या! भारतीय रेल्वेचा तिकीटांसंदर्भातील नियमात मोठा बदल, जाणून घ्या नवा निर्णय

भारतीय रेल्वेने आपातकालीन कोट्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. अनपेक्षित किंवा आपत्कालीन परिस्थितीमुळे तातडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेनमध्ये या जागा राखीव ठेवलेल्या असतात. 

 

Advertisement
1/9

जर तुम्ही रेल्वेच्या आपातकालीन कोट्यातून तिकिट बुक करण्यावर अवलंबून असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वेने इमर्जन्सी कोट्यातून विनंती अर्ज सादर करण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. 

 

2/9

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रवाशांना आता ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या किमान एक दिवस आधी त्यांचा विनंती अर्ज दाखल करावा लागणार आहे.  

 

3/9

मंगळवारी रेल्वे मंत्रालयाने आपातकालीन कोट्याच्या नियमांमध्ये बदल करण्याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. या परिपत्रकात म्हटलं आहे की, "0000 ते 1400 तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या सर्व गाड्यांसाठी इमर्जन्सी कोटा विनंती अर्ज प्रवासाच्या आदल्या दिवशी 1200 तासांपर्यंत EQ सेलवर पोहोचली पाहिजे."

 

4/9

"1401 ते 2359 तासांच्या दरम्यान सुटणाऱ्या सर्व उर्वरित गाड्यांसाठी आपातकालीन कोटा विनंती अर्ज प्रवासाच्या आदल्या दिवशी 1600 तासांपर्यंत EQ सेलवर पोहोचला पाहिजे," असंही त्यात म्हटलं आहे.

 

5/9

रेल्वे मंत्रालयाने रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट अंतिम करण्याचा अलिकडच्या निर्णयानंतर, आपत्कालीन कोटा विनंती सादर करण्याच्या वेळेत सुधारणा केली आहे.

 

6/9

यापूर्वी, रेल्वे बोर्डाने ट्रेनचा आरक्षण चार्ट 4 तासांऐवजी 8 तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. दुपारी 2:00 च्या आधी सुटणाऱ्या गाड्यांसाठी, चार्ट आदल्या दिवशी रात्री 9:00 वाजता तयार करण्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय, रेल्वेकडून प्रवासी आरक्षण प्रणालीत बदल करण्याची चर्चा देखील झाली होती. 1 जुलैपासून, तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता, फक्त व्हेरिफाईड युजर्स तत्काळ तिकिटे बुक करू शकतात. 

 

7/9

नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, ट्रेन सुटण्याच्या दिवशी केलेली विनंती स्विकारली जाणार नाही. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, विशेषत: रविवारी किंवा रविवार नंतर लगेच सुटीच्या दिवशी सुटणाऱ्या गाड्यांसाठी विनंती अर्ज कामाकाजाच्या अखेरच्या दिवशी सादर करावा. 

 

8/9

रेल्वे बोर्डाच्या आरक्षण कक्षाला व्हीआयपी, रेल्वे अधिकारी, वरिष्ठ नोकरशहा आणि विविध सरकारी विभागांकडून मोठ्या प्रमाणात विनंती अर्ज येतात असंही परिपत्रकात सांगण्यात आलं आहे. मात्र सर्वांना समान न्याय देण्यासाठी प्रयत्न होतात असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

 

9/9

मंत्रालयाने सर्व अधिकाऱ्यांना या वेळापत्रकांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून वाटप वेळेत केले जातील आणि चार्ट तयार करण्यास विलंब होणार नाही. तसेच फॉरवर्डिंग अधिकाऱ्यांना संदर्भातील व्यक्तीची प्रामाणिकता सुनिश्चित करण्याची आणि आपत्कालीन कोट्याच्या वाटपाबाबत विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती केली आहे.

 





Read More