रेल्वेने मुंबई, पुणेकरांना गुड न्यूज दिलीय. मुंबई आणि पुण्याहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळू शकते तसेच ट्रेनमधील गर्दी कमी होऊ शकते.
Special Trains: मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. अशावेळी रेल्वे प्रवास करताना कन्फर्म तिकीट आणि ट्रेनमधील गर्दी ही समस्या कायम असते. पण आता रेल्वेने मुंबई, पुणेकरांना गुड न्यूज दिलीय.
मुंबई आणि पुण्याहून मध्य प्रदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान कन्फर्म तिकीट मिळू शकते तसेच ट्रेनमधील गर्दी कमी होऊ शकते.
रेल्वेने सप्टेंबरपर्यंत विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे मुंबई ते रीवा आणि पुणे आणि जबलपूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
02188 सीएसएमटी मुंबई-रीवा स्पेशल 28 जूनपर्यंत दर शुक्रवारी धावत होती. ती आता 27 सप्टेंबरपर्यंत धावेल. तिच्या 13 ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत.
02187 रेवा-सीएसएमटी मुंबई स्पेशल ती 27 जूनपर्यंत दर गुरुवारी धावत होती, 26 सप्टेंबरपर्यंत तिच्या 13 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.
02131 पुणे-जबलपूर स्पेशल 1 जुलैपर्यंत दर सोमवारी धावतेय. तिचा कालावधी आता 30 सप्टेंपर्यंत वाढवण्यात आलाय. तिच्या13 ट्रिप होणार आहेत.
02132 जबलपूर-पुणे स्पेशल 30 जूनपर्यंत दर रविवारी धावत होती. ती 29 सप्टेंबरपर्यंत धावणार असून तिच्या 13 ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, विशेष ट्रेन क्रमांक 02188आणि 02131 च्या विस्तारित प्रवासासाठी विशेष भाड्याचे बुकिंग 29 जूनपासून करता येईल. रेल्वे तिकीट काऊंटरवर तसेच अधिकृत वेबसाइट http://www.irctc.co.in वर बुकींग करता येईल.
भारतीय रेल्वेची अधिकृत वेबसाइट www.enquiry.indianrail.gov.in वर तुम्हाला विशेष ट्रेनच्या थांब्यांची सविस्तर माहिती मिळेल.