रेल्वेत नोकरी लागावी, असे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळं कित्येक वर्ष ते तयारीदेखील करत असतात. मात्र रेल्वेत नोकरी नाही लागली तरी तुम्ही रेल्वेसोबत एक बिझनेस करू शकता. त्यासाठी तुम्हाला दरवर्षी रेल्वेला काही रक्कम फी म्हणून द्यावी लागेल. काय आहे हा बिझनेस जाणून घ्या.
आजच्या काळात अनेक जण रेल्वेत प्रवास करण्यासाठी ऑनलाइन ट्रेन तिकीट बुक करतात. अशावेळी तुम्ही रेल्वे तिरीट बुकिंग एजंट बनून प्रत्येक महिन्याला चांगली कमाई करु शकता. त्यासाठी तुम्हाला पहिले IRCTC कडे तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.
रेल्वे तिकीट बुकिंग एजंट बनण्यासाठी 2400 रुपयांपासून ते 8000 रुपये दरवर्षी द्यावे लागू शकतात. यात तुम्हाला वेगवेगळे प्लान मिळू शकतात. जसं की बेसिक प्लान, प्रिमियम प्लान, डायरेक्ट IRCTC किंवा प्रिन्सिपल सर्व्हिस प्रोव्हायडर
IRCTC च्या ऑफिशिअल डॉक्युमेंटनुसार, पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 30,000 रुपये + सर्व्हिस टॅक्स द्यावा लागू शकतो. यातून तुम्ही जेव्हा पण मेंबरशिप विड्रोल करु शकता तेव्हा तुम्हाला 20,000 रुपये रिफंड मिळतील.
कमाईबद्दल बोलायचे झाल्यास IRCTC तिकीट बुकिंग एजंटला नॉन एसी कोचचा तिकीट बुक करण्यासाठी प्रति तिकीट 20 रुपये आणि एसी क्लास तिकीट बुक करण्यासाठी 40 रुपये प्रति तिकीटसाठी कमिशन देते.
एका महिन्यात 101 ते 300 तिकीट बुक केल्यास तुम्हाला प्रति तिकीट आठ रुपये, 300 तिकीटपेक्षा जास्त तिकीट बुक केल्यास प्रति तिकीट पाच रुपये फी द्यावी लागेल.
तिकीटाच्या मुळ किमतीचा एक टक्का कमिशन म्हणून एजंटला दिला जातो. तिकीट एजंट एका दिवसात कितीही वेळा तिकीट बुक करू शकता.
एक ऑनलाइन फॉर्म भरा आणि तो सबमिट करा. आयआरसीटीसीला सही केलेला अर्ज आणि डेकलेरेशन फॉर्म स्कॅन करुन पाठवा. IRCTC तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफाय करेल. IRCTC ID बनवण्यासाठी 1,180 रुपये भरावे लागतील. OTP आणि व्हिडिओ व्हेरिफिकेशननंतर डिजीटल सर्टिफिकेट बनवावे लागेल. डिजीटल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आयआरसीटीसी फी भरावी लागेल. फी मिळाल्यानंतर तुम्हाला आयआरसीटीसीचे पासवर्ड मिळेल.
PAN कार्ड, आधार कार्ड, मोबाइल नंबर, वॅलिड ई मेल आयडी, फोटो, अॅड्रेस प्रुफ, डेक्लेरेशन फॉर्म आणि अॅप्लिकेशन फॉर्म