PHOTOS

Indian Railways : ट्रेनच्या 1st AC, 2nd AC आणि 3rd AC कोचमध्ये काय फरक आहे? यात कुठल्या सुविधा मिळतात?

;भारतीय रेल्वे ही सर्वसामान्यांची लाइफलाइन मानली जाते. देशाच्या कानाकोपऱ्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वस्त आणि जलद गतीने...

Advertisement
1/8

रेल्वेमध्ये चार प्रकारचे एसी कोच असतात. पहिल्या एसी, दुसऱ्या एसी आणि तिसऱ्या एसी त्याशिवाय रेल्वेने नवीन इकॉनॉमी क्लास कोच सुरु आहे. या सर्व बोगीमध्ये एसी असून उन्हाळ्यात या कोचमधून प्रवास करणे आनंददायी अनुभव आहे. या चार बोगीमध्ये काय सुविधा असतात पाहूयात. 

 

2/8

महत्त्वाच्या आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये प्रथम श्रेणी म्हणजे 1st AC असतो. या कोचमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्त पैसा मोजावे लागतात. या बोगीमध्ये दोन आणि चार आसनी बर्थ असतात. जिथे चार बर्थ असतात त्याला केबिन असं म्हणतात. दोन बर्थ असलेल्याला कूपे म्हणतात. काही कूपमध्ये एकच बर्थ असतो. तर चार बर्थ असलेल्या केबिनची संख्या चार असते. याचं वैशिष्ट्य म्हणजे साइड बर्थ नसतो. या कोचमध्ये एकूण बर्थची संख्या ही 24 असते. तर त्याची सीट रुंद असून क्लास कोचपेक्षा ती जास्त असते आणि आरामदायी असते. 

 

3/8

वरच्या वर्थवर जाण्यासाठी या कोचमध्ये जिन्याची सोय असते. प्रत्येक बर्थवर एक वाचण्यासाठी दिवा दिलेला असतो. यात केबिन आणि कूपलाही खास दरवाजे असतात. प्रत्येक केबिन आणि कूप कार्पेट असतात. कचरा टाकण्यासाठी एक कचराकुंडी असते. एवढंच नाही तर कोच अटेंडंटला कॉल करण्यासाठी खास बेल बटण दिलेले असतं. विशेष म्हणजे या कोचमध्ये आंघोळी करण्यासाठी सुविधा असते. तुम्हाला आंघोळ करण्यासाठी गरम किंवा थंड पाण्याची सोय असते. 

 

 

4/8

जेव्हा तुम्ही एसी फर्स्टमध्ये तिकीट खरेदी करता तेव्हा त्यावर फक्त 'कन्फर्म्ड' असं लिहिलं असतं. कारण हा कोच एक्झिक्युटिव्ह क्लास मानला जातो. यामध्ये देशातील व्हीव्हीआयपींना प्रथम प्राधान्य देण्यात येतं. चार्ट बनवल्यानंतरच तुम्हाला तुमचा बर्थ नंबर सांगण्यात येतो. एवढंच नाही तर, जर तुम्हाला दोन बर्थ असलेली कूप घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला रेल्वेला कारणासह एक विनंती पत्र द्यावे लागते. जर ते योग्य वाटले तर रेल्वे तुम्हाला एक कूप देतं. पहिल्या एसीमध्ये A ते H पर्यंत केबिन आणि कूप असतात. त्यामध्ये चार आणि दोन बर्थची संख्या 1 ते 24 पर्यंत असते. ट्रेनच्या प्रवासी तिकीट निरीक्षकांना व्हीआयपी हालचालीनुसार तुमचा बर्थ नंबर बदलण्याचा अधिकार देण्यात आला असतो. 

5/8

सेकंद क्लास एसी कोचचे भाडं हे फर्स्ट क्लास कोचपेक्षा कमी अशतं. गाड्यांमध्ये त्याची संख्या एक किंवा दोन असते. या कोचमध्ये चार खालचे आणि वरचे बर्थ असतात. त्याच्या अगदी समोर दोन बर्थ असतात एक खाली आणि एक वरती असते. त्यातील बर्थची संख्या 46/52 असतात. त्यामुळे 2nd AC कोचमध्ये प्रवाशांची संख्या कमी असते. तर या कोचमधील सुविधाबद्दल बोलायचं झालं तर, बर्थ देखील आरामदायी आणि रुंद असते. त्याच्या प्रत्येक डब्याला पडदे असतात. तर प्रवाशांना बेडशीट, ब्लँकेट, उशी आणि लहान टॉवेल देण्यात येतात. त्याशिवाय वाचनासाठी बर्थवर छोटा दिवा आणि मोबाईल चार्जिंग पॉइंट्स असतो. 

 

 

6/8

भारतीय रेल्वेने परवडणाऱ्या दरात वातानुकूलित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी गाड्यांमध्ये 3 अ म्हणजेच थर्ड क्लास कोच सुरू केले आहेत. या कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. विशेषतः मध्यमवर्गीय लोकांना त्यात प्रवास करायला आवडते. या श्रेणीतील कोचची वाढती मागणी लक्षात घेऊन, रेल्वेने महत्त्वाच्या गाड्यांमध्ये थर्ड क्लास एसी कोचची संख्या 6 पर्यंत वाढवली आहे. त्याच वेळी, स्लीपर क्लासेसची संख्या कमी करण्यात आली आहे. सुविधांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात एकूण जागांची संख्या देखील 72 आहे. एका डब्यात 6 बर्थ आहेत. दोन खालचे, दोन मधले आणि दोन वरचे बर्थ. याच्या अगदी समोर खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला दोन बर्थ आहेत. 2 ए सेकंड क्लास प्रमाणे डब्यांमध्ये पडदे नाहीत. 

7/8

प्रवास करताना प्रवाशांना भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांचा कोच शोधणे असतो. ट्रेन आल्यावर पहिला एसी, दुसरा एसी आणि तिसरा एसी कसा ओळखायचा ते आम्ही तुम्हाला सांगतो. समजा तुमचे तिकीट फर्स्ट क्लास 1 ए एसी मधील बर्थसाठी आहे. ते ओळखण्यासाठी रेल्वेने कोचच्या मध्यभागी एक डिस्प्ले बोर्ड बसवला आहेत. ज्यावर H1 लिहिलंलं असतं. त्याप्रमाणे एसी 2 कोचवर A1 लिहिलंलं असतं. एसी 3 कोचवर B1 लिहिलंलं असतं. जर कोचची संख्या वाढली तर ती A2 किंवा B2 मध्ये बदलली जाते. याशिवाय ट्रेन येण्यापूर्वी तुमचा बोगी कुठे थांबेल हे दर्शविण्यासाठी स्टेशनवर कोच डिस्प्ले बोर्ड देखील असतात. 

 

8/8

रेल्वेने प्रवाशांसाठी वेगवेगळ्या श्रेणीतील कोचचे भाडे निश्चित केलं आहे. एसी फर्स्टमध्ये प्रवास करणे हे विमानात प्रवास करण्यासारखे आहे. मुंबई ते दिल्ली एसी फर्स्ट क्लाससाठी तिकीट दर प्रवासाच्या तारखेवर, उपलब्ध असलेल्या गाड्यांवर आणि तिकीट बुकिंगच्या वेळेवर अवलंबून असतात. सामान्यतः, एसी फर्स्ट क्लासचे तिकीट दर 4000 ते 8000 पर्यंत आहे.  तर एसी 2 ची किंमत 2260 आणि एसी 3 ची किंमत 1090 ते ₹2070 इतकी आहे. 

 





Read More