Smriti Mandhana Photos: भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधनाचे (Smriti Mandhana) अनेक चाहते आहेत. आपल्या धडाकेबाज खेळीसाठी ओळखली जाणारी स्मृती तिच्या स्टाइलिश फोटोंमुळे देखील चर्चेत असते.
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिने आपल्या खेळाने जगभरात नाव कमावत असताना स्मृती मंधानाच्या फोटोशूट करताना तीने निळ्या रंगाच्या ऑफ-शोल्डर गाउनसह पांढरा टी-शर्ट परिधान करताना दिसत आहे.
तसेच तिने पांढऱ्या शर्टसोबत स्लीव्हलेस ब्लू शॉर्ट ड्रेस मॅच केलाय आणि पांढरे मोजे घातले आहेत. केसांना मेकअपशिवाय साध्या पोनीटेलमध्ये स्टाईल केले आहे. स्त्रिया ज्याप्रकारे सर्व प्रकारचे आऊटफिट्स कॅरी करतात, त्याचप्रमाणे त्या प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकावू शकतात, असे तिचे हे फोटोशूट सांगत आहे.
स्मृती मानधना एकटीच प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत खेचू आणण्यासाठी सक्षम आहे. कारण तिचे मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. या फोटोमध्ये तिने मिड-लेन्थ ब्लॅक प्लीटेड स्कर्ट, पिंक आणि ब्लॅक शर्ट आणि क्रॉप ब्लेझरमध्ये दिसत आहे.
स्मितीने तिच्या प्रत्येक लूकला वेगळा टच देण्याचा प्रयत्न केलाय. या फोटोमध्ये, ती पांढरा शर्ट आणि टाय असलेल्या स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये दिसत आहे. अधिकाधिक महिलांनी खेळात रस दाखवावा अशी तिची इच्छा असल्याचे म्हटले आहे.
सध्या विंटर सीझन आला आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या पांढऱ्या शर्टसोबत राऊंड नेकलाइनचे मल्टीकलर स्वेटर नक्कीच ट्राय करू शकता. जशी स्मृती मानधना या फोटोत दिसत आहे.
स्मृतीला इंडियन आऊटफिट्सचीही खूप आवड आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी नक्षी असलेला लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे आणि कमीतकमी मेकअप आणि दागिन्यांसह ती सुंदरही दिसत आहे.