क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघातील ही लोकप्रिय खेळाडू एका नव्या रुपात तुमच्यासमोर... पाहा Photos
क्रिकेट क्षेत्रात पुढे जात असताना स्मृती नकळत अनेक नवोदित खेळाडू तरुणींसाठी आदर्श ठरली. तुम्हाला माहितीये का, तिनं भावाच्या किटनं क्रिकेट खेळण्याची सुरुवात केली होती.
साधारण 11 वर्षांआधी तिनं महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात स्थान मिळवलं.
सध्या स्मृतीच्या हाती भारतीय महिला क्रिकेच संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.
या खेळात स्मृतीनं तिच्या वडिलांचा आदर्श कायम डोळ्यापुढं ठेवला. स्मृतीचा भाऊ आणि वडील सांगलीच्या संघातून खेळत होते.
ती वडिलांच्या खेळीनं इतकी प्रभावित झाली की त्यांच्यासारखंच डाव्या हातानं खेळू लागली.
आतापर्यंत तिनं टी20 (T20 matches) कारकिर्दीमध्ये 12 सामन्यांत 2600 धावा पूर्ण केल्या आहेत. येत्या काळातही स्मृती अशीच कामगिरी करत क्रीडारसिकांच्या मनाचा ठाव घेत राहील यात शंका नाही.