PHOTOS

भारतातील एकमेव ट्रेन जिला इंजिन नाही तरीही सुसाट! राजधानी-शताब्दी एक्स्प्रेस पडतात फिक्या

आज आपण अशा ट्रेनबद्दल जाणून घेऊया जिला इंजिनच नाही. असे असले तरी प्रत्येक राज्य स्वतःसाठी या ट्रेनची मागणी करत आहे. यावरुन देशातील पहिल्या इंजिन-लेस ट्रेनच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

Advertisement
1/8
भारतातील एकमेव ट्रेन जिला इंजिन नाही तरीही सुसाट! राजधानी-शताब्दी एक्स्प्रेस पडतात फिक्या
भारतातील एकमेव ट्रेन जिला इंजिन नाही तरीही सुसाट! राजधानी-शताब्दी एक्स्प्रेस पडतात फिक्या

Engine Less Train: खडखडाट करणारी, शिट्टी वाजवणारी ट्रेन तुम्ही जुन्या सिनेमांमध्ये पाहिली असेल. काहींनी अशा ट्रेननेही प्रवास केला असावा. तुम्ही ट्रेनच्या समोर इंजिन पाहिलं असेल, इंजिनमध्ये बसलेला लोकोमोटिव्ह पायलटही तुम्ही पाहिला असेल.

2/8
प्रत्येक राज्य करतय मागणी
प्रत्येक राज्य करतय मागणी

पण आज आपण अशा ट्रेनबद्दल जाणून घेऊया जिला इंजिनच नाही. असे असले तरी प्रत्येक राज्य स्वतःसाठी या ट्रेनची मागणी करत आहे. यावरुन देशातील पहिल्या इंजिन-लेस ट्रेनच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.

3/8
ताशी 160 किमी वेग
 ताशी 160 किमी वेग

या ट्रेनला इंजिन नसले तरी वेगाच्या बाबतीत ही ट्रेन राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेससारख्या ट्रेनशी स्पर्धा करते.ट्रायल रनमध्ये  इंजिन-लेस हायस्पीड ट्रेनचा वेग ताशी 183 किमी होता. पण ट्रॅकच्या क्षमतेमुळे ही ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावते.

4/8
ट्रेन कशी बनली?
 ट्रेन कशी बनली?

या ट्रेनचे नाव वंदे भारत एक्सप्रेस आहे. हिला ट्रेन 18 देखील म्हणतात. ही सेमी हायस्पीड ट्रेन लोकांना खूप आवडते. तुम्ही याआधी या ट्रेनने प्रवास केला असेल पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या ट्रेनमध्ये इंजिन नाही. इंजिन नाही मग ही ट्रेन सर्वात वेगवान ट्रेन कशी बनली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

5/8
राजधानी आणि शताब्दी ट्रेनचे पुढचे वर्जन
 राजधानी आणि शताब्दी ट्रेनचे पुढचे वर्जन

ही ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) त तयार झालेली ही ट्रेन देशातील पहिली इंजिन नसलेली ट्रेन आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही राजधानी आणि शताब्दी ट्रेनचे पुढचे वर्जन असल्याचे म्हटले जाते. वेग आणि सुविधांच्या बाबतीत ही ट्रेन सध्या देशात पहिल्या क्रमांकावर आहे.

6/8
इंटिग्रेटेड इंजिन
 इंटिग्रेटेड इंजिन

भारतीय ट्रेनमध्ये एक वेगळा इंजिन कोच बोगींना जोडलेला असतो, हे तुम्ही पाहिले असेल. पण 'वंदे भारत'मध्ये बुलेट किंवा मेट्रो ट्रेनसारखे इंटिग्रेटेड इंजिन असते. जे कोच किंवा बोगींना जोडलेले असते.

7/8
दोन लोकोमोटिव्ह पायलट
 दोन लोकोमोटिव्ह पायलट

वेगळे इंजिन नसल्याने ट्रेनचा वेग जास्त असतो. इंजिनविरहित इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्यासाठी ट्रेनच्या बोगीमध्येच संपूर्ण यंत्रणा बसवण्यात आली आहे. असे असले तरी आवश्यकतेनुसार दोन लोकोमोटिव्ह पायलट ट्रेनमध्ये उपस्थित आहेत.

8/8
प्रवासाचा वेळ जवळपास 15 टक्क्यांनी कमी
प्रवासाचा वेळ जवळपास 15 टक्क्यांनी कमी

ही ट्रेन पूर्णपणे मेड इन इंडिया प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आली आहे. तिचा टॉप स्पीड 180 किमी प्रति तास आहे. सध्या सुरक्षेच्या समस्यांमुळे ट्रेन ताशी 130 किमी वेगाने धावते. जास्त वेगामुळे या ट्रेनचा प्रवासाचा वेळ जवळपास 15 टक्क्यांनी कमी होतो.





Read More