भारतीय चित्रपटसृष्टीत कोणता अभिनेता सर्वात जास्त फी घेतो हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
भारतीय सिनेसृष्टीत असे कलाकार आहेत ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
प्रसिद्ध कलाकार चित्रपटांमध्ये भूमिका करण्यासाठी निर्मात्यांकडून मोठी रक्कम घेतात.
हा अभिनेता प्रभास, शाहरुख खान किंवा सलमान खान नसून तमिळ अभिनेता थलपती विजय आहे.
सध्या थलपती विजय हा त्याच्या आगामी चित्रपटात व्यस्त आहे. ज्याचे नाव 'थलपथी 69' आहे.
रिपोर्टनुसार, 'थलपथी 69' साठी अभिनेत्याने 275 कोटी रुपये फी आकारली आहे. त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा चित्रपट असणार आहे.
थलपती विजय हा राजकारणात सक्रिय होणार असून त्याने चित्रपटांच्या फीच्या बाबतीत अनेक मोठ्या कलाकारांना मागे टाकले आहे.