PHOTOS

भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता, कमाईच्या बाबतीत सलमान- प्रभासलाही दिली टक्कर!

भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता, ज्या व्यक्तीची उंची फक्त 4 फूट 8 इंच आहे. पण त्याच्या अभिनयाने आणि चित्रपटांच्या यशाने तो सर्वांच्या पुढे निघाला आहे. 'विक्रम', 'जेलर' आणि 'जवान'सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्याने केवळ 5 वर्षांत 2200 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Advertisement
1/7

जेव्हा आपण भारतातील मोठ्या सुपरस्टार्सबद्दल बोलतो. तेव्हा शाहरुख खान, सलमान खान, रजनीकांत, अमिताभ बच्चन, प्रभास आणि कमल हासन यांची नावं लगेच आठवतात. पण तुम्हाला माहित आहे का, एक असा अभिनेता आहे जो उंचीने छोटा असला तरी त्याचे यश आकाशाएवढे मोठे आहे?

2/7

हा अभिनेता म्हणजे जफर सादिक. तुम्ही त्याला 'जेलर' आणि 'जवान'सारख्या चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. 4 फूट 8 इंच उंच असलेला जफर सादिक भारतातील सर्वात लहान उंचीचा अभिनेता मानला जातो आणि त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे.

3/7

जफर सादिकने आपल्या करिअरची सुरुवात एक नर्तक म्हणून केली होती. नंतर तो अभिनयाच्या क्षेत्रात आला आणि अल्पावधीतच एक प्रसिद्ध अभिनेता झाला. सध्या त्याचं वय 29 वर्षं आहे आणि तो गेली पाच वर्षं फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

4/7

2020 मध्ये तमिळ चित्रपट 'पावा कधिगल' मधून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'विक्रम' या चित्रपटात तो खलनायकाच्या टोळीचा भाग म्हणून झळकला. या चित्रपटात त्याने कमल हासन आणि विजय सेतुपतीसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. 'विक्रम'नंतर तो संपूर्ण देशभरात ओळखला जाऊ लागला.

5/7

यानंतर जफरने रजनीकांतच्या 'जेलर' चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आणि शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्याची शेवटची झलक 'बेबी जॉन'मध्ये दिसली.

 

6/7

आतापर्यंत जफर सादिकने ज्या चित्रपटांमध्ये काम केलं, त्यांनी बॉक्स ऑफिसवर अफाट यश मिळवलं. 'विक्रम'- 414 कोटी रुपये, 'जेलर'- 605 कोटी रुपये, 'जवान'- 1150 कोटी रुपये. याचा एकूण हिशोब केला तर, त्याच्या 5 वर्षांच्या कारकिर्दीत त्याच्या चित्रपटांनी तब्बल 2200 कोटी रुपयांची कमाई केली आहे

7/7

गेल्या पाच वर्षांत कोणत्याही मोठ्या सुपरस्टारने एवढं सातत्याने यश मिळवलं नाही. केवळ शाहरुख खानने 2023 मध्ये तीन चित्रपटांतून 2600 कोटींचा गल्ला जमवला. बाकी सलमान, प्रभास, रजनीकांत कुणीच जफरच्या या झपाट्याच्या यशाशी स्पर्धा करू शकले नाहीत.





Read More