PHOTOS

बॉलिवूडमधील 9 सिंगल मातांची प्रेरणादायी कहाणी; नवऱ्याशिवाय एकट्याने केला मुलांचा सांभाळ

णि आव्हानात्मक काम असतं. कारण मुलांना लहानपणापासून चांगले संस्कार देत, त्यांना सुरक्षित आणि सक्षमपणे वाढवणं सोपं नाही. बॉलिवूडमधील अशा ...

Advertisement
1/9
1. अमृता सिंग
1. अमृता सिंग

बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने 1991 मध्ये सैफ अली खानशी लग्न केले आणि 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर अमृताने आपली दोन्ही मुलं, सारा अली खान आणि इब्राहिम अली खानला एकट्याने वाढवले.

2/9
2. श्वेता तिवारी
2. श्वेता तिवारी

श्वेता तिवारीने 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्न केलं. मात्र, 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगी आहे - पलक तिवारी. त्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं आणि 2019 मध्ये तेही संपलं. त्यांना एक मुलगा - रेयांश आहे. श्वेताने दोन्ही मुलांना एकटीने वाढवलं.

 

3/9
3. करिश्मा कपूर
3. करिश्मा कपूर

2003 मध्ये करिश्मा कपूरने उद्योजक संजय कपूरशी लग्न केलं. मात्र, 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर करिश्माने आपल्या दोन्ही मुलांना समायरा आणि कियान यांना एकटीनेच वाढवलं. 12 जून 2025 रोजी संजय कपूरचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाले.

4/9
4. सुष्मिता सेन
4. सुष्मिता सेन

सुष्मिता सेनने कधीही लग्न केलं नाही. तिने 2000 मध्ये रेनी आणि 2010 मध्ये अलिसा या दोन मुलींना दत्तक घेतलं. ती दोघींनाही एकटीने प्रेमाने आणि जबाबदारीने वाढवत आहे.

 

5/9
5. संजीदा शेख
5. संजीदा शेख

'हीरामंडी: द डायमंड बाजार' फेम अभिनेत्री संजीदा शेखने 2012 मध्ये आमिर अलीशी लग्न केलं. मात्र, 2021 मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर ती तिची मुलगी आयरा अली हिला एकटीने वाढवत आहे.

6/9
6. एकता कपूर
6. एकता कपूर

2019 मध्ये दिग्दर्शिका आणि निर्माती एकता कपूरने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला. अविवाहित असूनही ती आपला मुलगा रवि कपूर याचे संगोपन स्वतः करत आहे.

7/9
7. नीना गुप्ता
7. नीना गुप्ता

नीना गुप्ता वेस्ट इंडिज क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. विवियन रिचर्ड्स हे विवाहित असल्यामुळे नीना गुप्ता यांनी आपली मुलगी मसाबाला एकटीने वाढवलं. आज मसाबा ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.

8/9
8. पूनम ढिल्लन
8. पूनम ढिल्लन

80-90च्या दशकात पूनम ढिल्लनने अनेक सुपरहिट चित्रपट केले. तिने उद्योगपती अशोक ठाकेरियाशी लग्न केलं. मात्र, नंतर घटस्फोट घेतला. त्यांनी आपली मुलगी पालोमा आणि मुलगा अनमोलला एकटीने वाढवलं. आज हे दोघंही इंडस्ट्रीत चांगली कामगिरी करत आहेत.

9/9
9. पूजा बेदी
9. पूजा बेदी

90च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बेदीने 1994 मध्ये फरहान फर्निचरवालाशी लग्न केलं. त्यांना अलाया आणि ओमर ही दोन मुलं झाली. 2003 मध्ये घटस्फोटानंतर पूजाने दोन्ही मुलांचं संगोपन एकटीने केलं. आज अलाया ही बॉलिवूडमधील अभिनेत्री आहे.





Read More