World Unique Bridge in Meghalaya: जगाला अंचब्यात टाकेल असा पूल भारतात आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर?
...Living Root Bridge: ब्रीजमुळे एका बाजून दुसऱ्या बाजूस जाणं सोपं होतं. आपल्या देशात इंजिनीअर्सनी बांधलेले अनेक ब्रीज आहेत. पण काही ब्रीज इतक्या वाईट अवस्थेत असतात कीह बांधल्याच्या काही वर्षांतच कोसळतात. त्यामुळे इंजिनीअर्सच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.
दरम्यान जगाला अंचब्यात टाकेल असा पूल भारतात आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर? हो मेघालयमध्ये असा वर्षानुवर्षे टिकणारे पूर्ल आहेत, जे इंजिनीअर नव्हे तर निसर्गाच्या मदतीने बांधले गेले आहेत.
आपल्या आजुबाजूला पुष्कळ पुल आहेत जे दोन ठिकाणांना एकमेकांशी जोडतात. यामुळे वाहतूक, दळणवळण सोपी होते. त्याच कारणामुळे पुल आणि ब्रिजची आपली एक वेगळी ओळख आहे. पण मेघालयमध्ये असलेले पूल तुम्हाला अचंब्यात टाकू शकतात. मेघालयमध्ये जास्त पाऊस पडतो. त्यामुळे तिथल्या नागरिकांना सर्व परस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. यातच मेघालयातील लिव्हिंग रूट ब्रिज संकल्पना उदयास आलीय.
या पुलाची सर्वात खास गोष्ट म्हणजे तो पूर्णपणे झाडांच्या मुळांपासून बनलेला आहे आणि आजही तो बांधला गेला तेव्हा जितका मजबूत आहे तितकाच तो मजबुतीने उभा आहे.
आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की इतका अद्भुत पूल बांधण्यासाठी उच्च प्रशिक्षित इंजिनिअर्सना अथक प्रयत्न करावे लागले असतील. पण हे अजिबात खरे नाही. खासी आणि जैंतिया जमातीचे लोक मेघालयात बऱ्याच काळापासून राहत आहेत. ज्यांनी झाडांच्या मुळांपासून पूल बांधण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे.
माध्यमांतून समोर आलेल्या वृत्तानुसार, हा पूल 180 वर्षांहून अधिक जुना आहे. हा पूल झाडांच्या जिवंत मुळांना धाग्यांसारखे विणून बनवला आहे आणि त्यावर एका वेळी 50 लोक आरामात चालू शकतात. मेघालयाच्या घनदाट जंगलातून जाणारी नदी ओलांडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला आहे.
हा जिवंत मुळांचा पूल रबराच्या झाडाच्या मुळांपासून बनवण्यात आलाय. ज्याला फिकस इलास्टिका झाड म्हणून ओळखले जाते. या अद्भुत गुणवत्तेमुळे या पुलाला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.
या आश्चर्यकारक पुलाच्या काही मुळांचा आकार 100 फूटांपर्यंत आहे आणि त्यांना योग्य आकार येण्यासाठी 10 ते 15 वर्षे लागतात. पाण्याच्या सतत संपर्कामुळे अनेक मुळे कुजू लागतात पण नवीन मुळे वाढत राहतात. या सर्व पुलांपैकी सर्वात खास म्हणजे चेरापुंजी येथे असलेला डबल-डेकर रूट ब्रिज. तो पूल एकावर एक असा बांधला गेला आहे.