आजच्या काळात कॉम्युटर आणि लॅपटॉपवरच कामे होतात. अनेक कार्यालयातील कामे ही कॉम्युटरवरच अवलंबून असतात. विद्यार्थ्यांनादेखील आजकाल अभ्यासासाठी लॅपटॉप लागतोच.
लॅपटॉप किंवा कॉम्युटर वापरत असताना तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? कीबोर्डच्या स्पेस बारची साइज अन्य बटणांच्या तुलनेत मोठी का असते? आज जाणून घेऊयात.
कीबोर्डचा स्पेस बार अन्य बटणांच्या तुलनेत मोठा असतो कारण टायपिंग करताना याचा वापर अधिक होत असतो.
साधारणतः लोक टायपिंगसाठी दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करतात. अशातच स्पेस बार मोठा असल्याने बोटांचे अंगठ्यांनी स्पेसबारचा वापर केला जाईल.
टायपिंग करताना स्पेस बारचा वापर दोन शब्दांमधील अंतर देण्यासाठी असतो. त्यासाठी स्पेस बारचा आकार मोठा असतो.
कीबोर्डमध्ये स्पेसबार खालच्या भागी असतो. याचा आकार मोठा असल्याने शोधण्यास फार कष्ट घ्यावे लागत नाहीत.
कीबोर्डमधील स्पेसबार आकाराने मोठा असल्याने टायपिंग स्पीड वाढते आणि वेळदेखील वाचतो.
स्पेस बारचा आकार मोठा नसता तर कदाचित स्पेस देण्यासाठी लोकांना बटण शोधावे लागले असते. ज्यामुळं टायपिंगचा स्पीड कमी झाला असता.
तसंच, त्यामुळं टायपिंग करताना चुकादेखील झाल्या असता. म्हणून कीबोर्डवरील स्पेस बारच्या बटणाची साइज मोठी असते.