International Women's Day 2024 Full Body Checkup : आई, बहीण, बायको आपल्या घरातील प्रत्येक ती स्त्री त्या घराची आधारा स्तंभ असते. ती कायम आपल्याकडे दुर्लक्ष करुन घरातील प्रत्येकाची ती काळजी घेत असते. नोकरी आणि घर या दोन्ही जबाबदारी ती पैलत असते. अगदी सणवार असो किंवा सोशल लाइफ सांभाळत तिची तारेवरती कसरत करत असते. पण आता महिला दिनी स्वत: साठी वेळ काढा. त्यात खास करुन महिला दिनीनिमित्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि काही टेस्ट नक्की करुन घ्या.
वाढत्या वयानुसार महिलांनो सगळ्यात पहिली टेस्ट मॅमोग्राम/अल्ट्रा सोनोग्राफी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही स्तनाचा कर्करोग निदान करणारी चाचणी आहे.
पुरुषांपेक्षा ऑस्टिओपोरोसिसचा धोका हा महिलांनामध्ये सर्वाधिक जास्त असल्याने ही टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे. हार्मोन इस्ट्रोजेनच्या घटत्या पातळीमुळे स्त्रियांमध्ये हाडांच्या समस्या निर्माण होत असते.
थायरॉईडचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असून सतत वजन वाढणे किंवा कमी होणे ही समस्या आहे. त्यामुळे महिलांनी ही चाचणी करणे गरजेच आहे.
हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजाराचा धोका आपल्याला असतो. म्हणून महिलांनो सीबीसी चाचणी नक्की करुन घ्या. या चाचणीद्वारे प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि हिमोग्लोबिनची पातळी किती आहे समजते.
अनुवांशिक चाचणीमध्ये अनुवांशिक रोग आहेत का हे जाणून घेण्यासाठी केली जाते. यामध्ये रक्ताच्या नमुन्याची टेस्ट करण्यात येते.
महिलांनो वयाच्या तिशीनंतर ड जीवनसत्त्वाची टेस्ट करुन घेणे गरजेच आहे. शरीरात जर ड जीवनसत्त्वं कमी असेल तर हाडं कमजोर होतात, म्हणून ही टेस्ट नक्की करुन घ्या.
महिलांनी बीएमआय अर्थात बॉडी मास इंडेक्स नियमित तपासून घेणे अतिशय महत्त्वाच आहे. बीएमआय टेस्टमुळे आपल्या शरीराचं वजन आपल्या उंचीच्या तुलनेत बरोबर आहे हे समजत.
वाढलेला ताणामुळे महिलांमध्ये रक्तदाबाची समस्या दिसून येते. त्यामुळे खरं तर महिन्यातून किमान एकदा रक्तदाबाची चाचणी करुन घ्या.
हिमोगोग्लोबीन चाचणी करणे महत्त्वाच आहे. कारण हिमोग्लोबिनच्या कमी असेल तर अँनेमियासारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे या महिला दिनी तुम्ही हिमोगोग्लोबीन चाचणी करुन घ्या.
हिमोग्लोबिन, रक्तदाबासोबतच अजून एक महत्त्वाची चाचणी म्हणजे मधुमेहाची टेस्ट अतिशय महत्त्वाची आहे. महिलांनी हे टेस्ट आवश्यक करुन घ्यावी.
आजकाल शारीरिक समस्यापेक्षा मानसिक आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांनो नैराश्यातून तुम्ही जात आहात की नाही यासाठी नैराश्य चाचणी करुन घ्या.
तुमच्या घरात लग्नायोग्य तरुणी असेल तर तिची थॅलेसेमिया आणि इतर हिमोग्लोबिनोपॅथी आणि लैंगिक संक्रमित रोगांसारख्या रक्ताशी संबंधित विकारांसाठी रक्त तपासणी करण्यात येते. त्यामुळे अनेक समस्या दूर होतात.