Womens Day Wishes in Marathi: 'जागितक महिला दिन' 8 मार्च रोजी साजरा केला जात आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक महिलेला जीच्यामुळे आपण घडलो तिची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस. जर तुम्हालाही तुमची आई, बहीण, पत्नी, वहिनी, मैत्रिणी किंवा मैत्रिणीला हा 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' विशेष वाटावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना या संदेशांद्वारे 'महिला दिनाच्या शुभेच्छा' पाठवू शकता.
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू झाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू...
ती आहे म्हणून सारे विश्र्व आहे ती आहे म्हणून सारे घर आहे ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा
"तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई साताजन्माची पुण्याई तुझी थोरवी महान तिन्हीलोकी तुला मान" जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
"ती आई आहे, ती ताई आहे, ती मैत्रिण आहे, ती पत्नी आहे, ती मुलगी आहे, ती जन्म आहे, ती माया आहे, ती सुरूवात आहे आणि तिच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा"
जिनं शिल्पकार होऊन तुमच्या जीवनाला आकार दिला, अशा प्रत्येक ‘ती’ला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
“स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे क्षणाची साथ तुझ्या कतृत्वाला सर्वांचा सलाम. जागतिक दिनाच्या शुभेच्छा.”
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या, आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेच मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
सुख दुःखात साथ देतेस, थकत नाहीस कधीच, आयुष्य माझं अधुरे तुझ्याविणा, साथ सोडू नको कधीच महिला दिनाच्या शुभेच्छा!
"तुझ्या उत्तुंग भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा"