PHOTOS

International Yoga Day 2025: मराठी अभिनेत्रींचं योगा प्रेम, वयाच्या 35-40 मध्येही दिसतात तरुण

 जागतिक योग दिनाच्या निमित्ताने अभिनयासोबतच फिटनेसची देखील तितकीच काळजी घेणाऱ्या अभिनेत्रींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

...
Advertisement
1/8

मराठी इंडस्ट्रीमधील अनेक अभिनेत्री धावपळीतून देखील योगा करतात. आज याच अभिनेत्री अभिनयासह फिटनेसने देखील खूप चर्चेत आहेत. 

2/8

वयाच्या 41 व्या वर्षी देखील अभिनेत्री माधवी निमकर दररोज योगा करून स्वत:च्या आरोग्याकडे विशेष लक्ष देते. फिट राहण्यासाठी योगापेक्षा दुसरा चांगला पर्याय असूच शकत नाही असं तिने सांगितलं आहे. 

 

3/8

 अभिनेत्री प्राजक्ता माळीला योगा करणे खूप आवडते. ती नेहमी तिचे योगाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

4/8

'चंद्रा' फेम अभिनेत्री अमृता खानविलकरला देखील योगाची प्रचंड आवड आहे. अभिनयासोबतच ती फिटनेसची देखील खूप काळजी घेते. आज तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. 

5/8

लॉकडाऊनच्या काळात जीम बंद असल्याने घरच्या घरी नियमित योगा करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. 38 व्या वर्षी देखील ती सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. 

6/8

अभिनेत्री रुपाली भोसले देखील नेहमी तिचे योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनयासोबतच ती योगाला देखील तितकेच महत्त्व देते. 

7/8

सौंदर्यासोबत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री रुचिरा जाधव ही देखील योगा प्रेमी आहे. जिथे असेल तिथे नियमित पणे ती योगा करते. 

8/8

'सैराट' चित्रपटातील आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिला देखील योगाची प्रचंड आवड आहे. तिने देखील योगाच्या माध्यमातून स्वत:मध्ये खूप बदल केला आहे. 





Read More