International Yoga Day 2023: दिवसाची सुरुवातच योगाभ्यासानं करण्याला तुम्हीही प्राधान्य देत असाल, तर हे फोटो तुम्हाला आणखी प्रेरणा देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विचारानं संपूर्ण जगाला योगसाधनेचं महत्त्वं पटवून दिलं. त्यांच्याच प्रस्तावामुळं जागतिक स्तरावर International Yoga Day साजरा केला जाऊ लागला.
भारतीय सैन्यही यात मागे राहिलं नाही. एएआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार लडाखमध्येही सैन्यदलाकडून International Yoga Day साजरा करण्यात आला. विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्येही योगा करत अनेकांनीच निरोगी आयुष्याचा कानमंत्र दिला.
सुरेख रचना आणि लक्षवेधी योगासनांचं प्रदर्शन यावेळी लडाखच्या पँगाँग त्सो तलाशयापाशी करण्यात आलं.
समुद्रसपाटीपासून तब्बल 13,862 उंचीवर सैन्यदलातील जवानांनी योगासनं केली.
निरभ्र आकाश, निळंशार पाणी आणि शरीराच्या क्षमता पारखणारी योगासनं असा सुरेख मेळ तिथं साधला गेला.
शक्य तिथं, शक्य तसं प्रत्येकानं योगासनं करत एका नव्या आयुष्याची आणि जीवनशैलीची निवड केली. तुम्ही कसली वाट पाहताय?