PHOTOS

International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतरही 'या' अभिनेत्रींचं तारुण्य कायम! योगाभ्यास करुन अशा राहतात फिट

International Yoga Day : बाळाच्या जन्मानंतर महिलेची फिगर खराब होते असा एक समज पूर्वीच्या काळातील अभिनेत्री आणि महिलांमध्ये होता. पण हाच समज आजच्या अभिनेत्रींनी खोटा ठरवला आहे. बाळाच्या जन्मानंतरही योगाभ्यास करुन या अनेक अभिनेत्री आज 40 नंतरही तरुण आणि फिट दिसतात. 

Advertisement
1/7

मराठी असो बॉलिवूडमधील अभिनेत्री असो, याच्याकडे पाहून प्रश्न पडतो त्या एवढ्या फिट आणि चेहऱ्यावर तेज कसं. तर याच उत्तर म्हणजे या अभिनेत्री योगाभ्यासवर खूप भर देतात. घरातच योगासनं करुन त्या स्वत:ला चिरतरुण ठेवतात. त्याशिवाय आपल्या सोशल मीडिया साइडवर योगाविषयी चाहत्यांना प्रोत्साहन देतात. 

2/7

यातील पहिलं नाव घ्यावं लागेल ते मलायका अरोराबद्दल...दोन मुलांची आई आणि 50 पार केल्यानंतरही ती कमालीच फिट दिसते. आजही तिच्या लूकने चाहते घायाळ होतात. 

3/7

यातील दुसरं नाव आहे शिल्पा शेट्टीच. शिल्पा शेट्टी कायम योगाभ्यास करताना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचही फिगर आणि ऊर्जा पाहून आश्चर्य वाटतं. 

4/7

आता नाव घेतोय आपण बेबो म्हणेजच आपली करिना कपूर. ही सुद्धा दोन मुलांची आई असून तिने गरोदरपणातही नियमित योगाभ्यास करुन स्वत:ला निरोगी ठेवलं. 

5/7

आलिया भट्ट हिने देखील योगा करुन स्वत:ला फिट ठेवलंय. अनेक अवघड योगासनं ती अतिशय सहजपणे करताना दिसते. तिच्या शरीराला एक लवचिकपणा आलाय. 

6/7

यात एक नाव अजून घ्यावसं वाटत ते म्हणजे सलमान खानची हिरोईन भाग्यश्रीचं. ती आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना योगासाठी प्रोत्साहन देते. ती योगा आणि सौंदर्य निगडीत घरगुती उपायांवर भर देते. 

7/7

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींबद्दल आपण बोललो. पण मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या वयातही योगाभ्यास करुन स्वत:ला फिट ठेवते. सोशल मीडियावर ती अनेक व्हिडीओ योगा करताना शेअर केले आहेत. 





Read More