Mutual Funds SIP Plans: 100 रुपयांच्या एसआयपीसह म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम म्युचअल फंड्स घेऊन आलो आहोत. आजकाल लोक अशा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम म्युचअल फंड्स घेऊन आलो आहोत. आजकाल लोक अशा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
फक्त १०० रुपयांच्या एसआयपीने गुंतवणूक सुरू करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एचडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाने गेल्या ३ वर्षात सुमारे ३६.१७% वार्षिक परतावा दिला आहे. हो, जर तुम्ही यामध्ये ₹५०० प्रति महिना दराने ₹१८,००० गुंतवले असते, तर ती रक्कम आज ₹२७,७९० पर्यंत वाढली असती.
कमी गुंतवणुकीत मोठा परतावा देणारा निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा फंड (Direct Plan - Growth) गुंतवणूकदारांसाठी उत्तम ठरू शकतो. फक्त ₹१०० पासून तुम्ही यामध्ये SIP सुरू करू शकता. या फंडाने गेल्या ३ वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे ३४.९५% परतावा दिला आहे.
जर तुम्हाला जास्त मोठी गुंतवणूक न करता फक्त १०० पासून तुमची गुंतवणूक सुरू करायची असेल, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. या फंडने गेल्या ३ वर्षात अंदाजे ३४.०२% वार्षिक परतावा दिला आहे.
१०० रुपयांपासून एसआयपी सुरू करणाऱ्यांसाठी, आदित्य बिर्ला सन लाईफ पीएसयू इक्विटी फंडही उत्तम आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या ३ वर्षात सुमारे ३४.३३% वार्षिक परतावा दिला आहे.
पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रात गुंतवणुकीसाठी डीएसपी इंडियाचा फंड उत्तम आहे. या फंडने गेल्या ३ वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांना सुमारे ३१.६८% चा मजबूत परतावा दिला आहे. ज्यांना खूप वेळासाठी स्थिर आणि चांगला परतावा हवा असल्यास हा फंड फायदेशीर ठरेल.
१०० रुपयांची छोटी गुंतवणूक करायची असल्यास एचडीएफसी मिड-कॅप अपॉर्च्युनिटीज फंड हा एक उत्तम पर्याय आहे. या म्युच्युअल फंडाने गेल्या ३ वर्षात ३१.१५% वार्षिक परतावा देऊन गुंतवणूकदारांना फायदा करून दिला आहे.
एडेलवाईस मिडकॅप फंडने गेल्या तीन वर्षांत सुमारे ३०.६७% इतका मजबूत वार्षिक परतावा दिला आहे. यामुळे १०० रुपयांच्या SIP ने सुरू होणारा एडलवाईस मिडकॅप फंड मिड-कॅप गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहे.