PHOTOS

आयपीएल २०१८- जेव्हा प्रिती झिंटा आणि अनुष्का शर्मा एकमेकींसमोर ठाकल्या...

Advertisement
1/6
Preeti and Anushka encounter
Preeti and Anushka encounter

शुक्रवारी आयपीलमध्ये बंगळूर आणि पंजाब या दोन संघांमध्ये सामना होता. बंगळूरच्या चेन्नास्वामी स्टेडियममध्ये या सीजनचा पहिला मॅच होता. यावेळी विराटसमोर पहिल्यांदाच अश्विन कर्णधार म्हणून ठाकला होता. या सामन्या दरम्यान पंजाब टीमची मालकीन आणि अभिनेत्री प्रीती झिंटाचा सामना विराटच्या टीमला चिअर करायला आलेल्या अनुष्का शर्मासोबत झाला. दोघी आमने सामने ठाकल्यावर त्यांची छबी कॅमेऱ्यात कैद झाली. 

 

2/6
Preeti and Anushka
Preeti and Anushka

मैदानात होणाऱ्या सामन्याचे चित्र या फोटोतून प्रतिबिंबीत होत आहे. दोघी अभिनेत्रींमध्ये मैत्रीपूर्वक व्यवहार असला तरी दोघीही आपआपल्या टीमचे समर्थन करताना दिसल्या. प्रिती तिच्या पंजाब टीमला तर अनुष्का विराटच्या बंगळूर टीमला चिअर करत होती.

 

3/6
Virat and anushka
Virat and anushka

या सामन्यात विराट धडाकेबाज कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. पण विराटने १६ बॉल्समध्ये २१ रन्स केले. ज्यात ४ चौकारांचा समावेश होता. लग्नानंतरची विराटची ही पहिली आयपीएल मॅच होती.

 

4/6
Anushka cheered Banaluru
Anushka cheered Banaluru

विराट उत्तम खेळला नसला तरी विराटच्या टीमने प्रेक्षकांना नाराज केले नाही. शेवटी ४ विकेटने बंगळूर टीमने विजय मिळवला. अनुष्काने हा आनंद खास अंदाजात व्यक्त केला. बंगळूरने पंजाबच्या १५६ रन्सचे लक्ष्य फक्त ६ विकेट गमावून १९.३ ओव्हर्समध्ये साध्य केले.

 

5/6
Preeti cheered punjab
Preeti cheered punjab

प्रीती झिंटाही आपल्या टीमला चिअर करण्यात कुठेही कमी पडली नाही. तिचा उत्साह शेवटपर्यंत कायम होता.   

6/6
Preeti and Anushka
Preeti and Anushka

मॅचमधील उतार चढावांचा परिणाम प्रीती आणि अनुष्कावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्या प्रतिक्रीयांची छबी कॅमेऱ्यात कैद करण्यात फोटोग्राफर्संना यश आले. 





Read More