PHOTOS

Ruturaj Gaikwad Girlfriend: कोण आहे गायकवाडांची होणारी सून? IPL जिंकल्यानंतर पहिल्यांदा समोर आली ऋतुराजची गर्लफ्रेण्ड

Ruturaj Gaikwad Girlfriend Photos: मूळाचा पुणेकर असलेला आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून सलामीवीर म्हणून यंदाचं पर्व गाजवणारा खेळाडू म्हणजे ऋतुराज गायकवाड! ऋतुराजने यंदाच्या पर्वामध्ये खोऱ्याने धावा काढल्या. त्यामुळेच त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळाली होती. मात्र लग्नाचं कारण देत ऋतुराजने आपण उपलब्ध नसू असं बीसीसीआयला कळवलं आहे. पण ऋतुराज कोणाशी लग्न करणार आहे याबद्दलची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिलेली होती. मात्र आता ऋतुराजची नवरी कोण होणार याची खात्रीलायक माहिती समोर आली असून त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटोही समोर आलेत...

Advertisement
1/13

आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात अहमदाबादच्या मैदानावर चेन्नईच्या संघाने गुजरात टायटन्सच्या संघावर 5 विकेट्सने विजय मिळवला. रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूंमध्ये 10 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

2/13

महेंद्रसिंह धोनीने अंबती रायडू आणि रविंद्र जडेजाच्या हस्ते चषक स्वीकारला जावा अशी इच्छा व्यक्त केल्याने सीएसकेच्या 3 खेळाडूंनी आयपीएलची ट्रॉफी स्वीकारली.

3/13

संपूर्ण संघाने अगदी जोशात या ट्रॉफीबरोबर फोटो काढले. यामध्येही धोनी अगदी कोपऱ्यात उभा असल्याचं दिसून आलं. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

4/13

चेन्नईच्या संघानेनंतर त्यांच्या संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांबरोबरही फोटो सेशन केलं. यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते खेळाडूंच्या पत्नींचाही समावेश होता.

5/13

चेन्नईच्या अनेक खेळाडूंचे पत्नीबरोबरचे फोटो त्यांच्या इन्स्ताग्रामवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये अजिंक्य रहाणेचाही समावेश आहे.

6/13

सामना जिंकून देणाऱ्या रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा आणि मुलीचाही आयपीएल चषकाबरोबर फोटो चेन्नईच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

7/13

विशेष म्हणजे या फोटोंमधील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो आहे चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा.

8/13

मुळ पुण्याचा असलेल्या ऋतुराजने यंदाच्या पर्वामध्ये संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी बरीच मेहनत केली. त्याच्या फलंदाजीचा संघाला खरोखरच चांगला फायदा झाला. शेवटच्या सामन्यात ऋतुराजने 16 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या.

9/13

ऋतुराजचं लग्न ठरल्याची बातमी नुकतीच समोर आली. मात्र त्याची पत्नी कोण आहे यासंदर्भातील खुलासा करण्यात आलेला नव्हता. तरी सीएसकेने अंतिम सामना जिंकल्यानंतर त्याची होणारी पत्नी त्याच्यासोबत मैदानावर सेलिब्रेट करताना दिसली.

10/13

ऋतुराज त्याची गर्लफ्रेण्ड उत्कर्षाबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. 3 जून रोजी दोघे लग्नबंधनात अडकतील असे वृत्त आहे. पण त्याआधीच हे दोघे अमहदाबादच्या मैदानात एकत्र सीएसकेचा विजय साजरा करताना दिसून आले. 

11/13

दोघांचा धोनीबरोबरचा फोटोही सीएसकेच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत धोनी मध्यभागी बसला असून त्याच्या एका बाजूला ऋतुराज तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा बसलेली आहे. या दोघांना लग्नाच्या आधीच लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

12/13

मागील अनेक वर्षांपासून ऋतुराज आणि उत्कर्षा रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलं जातं. उत्कर्षा ही मुळची पुण्याचीच असल्याचं सांगितलं जातं. मागील वर्षी या दोघांचा जीममधील एक फोटो व्हायरल झाला होता. आता पहिल्यांदाच या दोघांचे फोटो अधिकृतरित्या समोर आले आहेत. 

13/13

विशेष म्हणजे ऋतुराजबरोबर नाव जोडण्यात आलेली मराठमोळी अभिनेत्री सायली संजवीनेही दोघांना टॅग करत कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. 





Read More