IPL 2023 : आयपीएलचं मैदान आहे की आणखी काही? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. हो, पण इथं या वादानंही या स्पर्धेला एक वेगळाच तडका दिला असं म्हणायला हरकत नाही.
आता मात्र या स्पर्धेतूनच एक मोठी आणि तितकीच गंभीर बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे बंदीची.
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या संघाला योग्य दिशा देत असला तरीही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस याच्यावरही या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसन यालाही हा फटका सहन करावा लागला आहे. बरं, हा अखेरचा खेळाडू नाही.
लखनऊच्या संघाचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या केएल राहुलवरही ही कारवाई करण्यात आली असून, त्याचंही कर्णधारपद धोक्यात आहे.
तिथे रोहित शर्माच्या जागी संघाची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादव यालाही दंड ठोठावण्यात आला आहे. या सर्व खेळाडू/ कर्णधारांना स्लो ओव्हर रेट अर्थात धीम्या गतीनं षटकं टाकल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे जर, यापैकी कोणत्याही संघानं दुसऱ्यांना हीच चूक केली तर या कर्णधारांवरच बंदीची कारवाई करण्यात येईल. त्यामुळं संघाकडून घडलेली एक चूक या खेळाडूंना मोठा फटका देऊ शकते. त्यामुळं सध्या ही मंडळी काहीशी सावध झाली आहेत असं म्हणायला हरकत नाही.