PHOTOS

"CSK च्या मॅनेजमेंटमधील कोणीही..."; Dhoni च्या Retirement बद्दल Jadeja चं चाहत्यांना निराश करणारं विधान! .

Ravindra Jadeja on MS Dhoni Retirement: इंडियन प्रिमियर लिगचं यंदाचं म्हणजेच 2023 चं पर्व सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करेल अशी चर्चा होती. धोनी जुलै महिन्यात 42 वर्षांचा होणार आहे. चेन्नईने यंदाच्या पर्वात बेन स्ट्रोक्सला विकत घेतलं असून तोच धोनीची जागा भविष्यात घेईल अशी चर्चा आहे. असं असतानाच आता चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने धोनीच्या निवृत्तीसंदर्भात आपलं मत व्यक्त केलं असून धोनी कधी आणि कशापद्धतीने आयपीएलमधून निवृत्ती घेऊ शकतो याबद्दल भाष्य केलं आहे. जडेजा नेमकं काय म्हणालाय पाहूयात....

Advertisement
1/12

सीएसकेने सोमवारी लखनऊच्या संघावर रोमहर्षक विजय मिळवला. या सामन्यामध्ये सीएसकेने 12 धावांनी विजय मिळवला. धोनीनेही शेवटच्या 3 चेंडूंमध्ये दोन षटकारांच्या मदतीने 12 धावा केल्या होत्या हा ही योगायोगच. सीएसकेच्या या विजयाबरोबर या सामन्यापूर्वी रविंद्र जडेजाने धोनीसंदर्भात केलेलं विधानही चांगलेच चर्चेत आहे.

2/12

इंडियन प्रीमियर लीगचं 16 वं पर्व 31 मार्च 2023 पासून सुरु झालं आहे. भारताचा माजी कर्णदार महेंद्र सिंह धोनीचं हे शेवटचं आयपीएल असेल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

3/12

अर्थात 41 वर्षीय धोनी सध्या सीएसकेचा कर्णधार असला तरी अनेक तज्ज्ञांच्या मते हे धोनीचं शेवटचं आयपीएल असू शकतं. दरम्यान धोनीचा सहकारी आणि सीएसकेमधील वरिष्ठ खेळाडू असलेल्या जडेजाने धोनीच्या निवृत्तीबद्दल मोठं विधान केलं आहे.

4/12

धोनीने 2022 च्या पर्वामध्ये चेन्नईचं नेतृत्वं सोडलं होतं. त्यावेळी जडेजाकडे चेन्नईचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र पर्व संपूर्ण संपण्याआधीच वारंवार अपयशी ठरत असल्याने जडेजाने कर्णधार पद सोडलं होतं. जडेजाने कर्णधारपद सोडल्याने पुन्हा नेतृत्व धोनीकडेच सोपवण्यात आलं.

5/12

यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच चेन्नईचं नेतृत्व करत आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेचा रेकॉर्ड फारच दमदार आहे. आतापर्यंतच्या 15 पर्वांपैकी 13 पर्वांमध्ये चेन्नईने अंतिम सामन्यात धडक मारली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 4 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

6/12

काल म्हणजेच 3 मार्च 2023 रोजी झालेल्या सीएसके विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याच्या आधी स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना जडेजाने धोनीसंदर्भात मत मांडलं. धोनी हा चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या निवृत्तीबद्दल केवळ त्यालाच कल्पना आहे, असंही जडेजाने सांगितलं.

7/12

"माही भाई यंदाच्या पर्वात खेळत आहे. चाहत्यांनाही धोनीला चेन्नईच्या संघातून खेळताना पाहणं ही मोठी संधी आहे. चाहत्यांना कल्पना आहे की तो काय करु शकतो. सीएसकेच्या मॅनेजमेंटमधील कोणीही त्याला सांगणार नाही की त्याने काय केलं पाहिजे. त्याला थांबायचं असेल तर तो संघात थांबेल. त्याला जावसं वाटत असेल तर तो जाईल," असं जडेजा म्हणाला.

8/12

तसेच धोनी आयपीएलमधून निवृत्त होताना शांततेच निवृत्त होईल, असंही जडेजाने सांगितलं. म्हणजेच मोठ्या एखाद्या ठरवलेल्या सामन्यानंतर धोनी निवृत्ती घेईल किंवा निवृत्ती स्पेशल सामना धोनीसाठी खेळवला जाईल अशी शक्यता कमी असल्याचे संकेत जडेजाने दिले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधूनही धोनीने अचानक निवृत्ती जाहीर केली होती.

9/12

सेण्ड ऑफ सामना न होणं ही धोनीच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी असणार हे नक्कीच. कारण धोनीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती देताना ग्रॅण्ड सेण्ड ऑफ देण्यासाठी त्याच्या चाहत्यांबरोबरच बीसीसीआयही उत्सुक असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे.

10/12

"आमच्याकडे धोनीसंदर्भातील अनेक आठवणी आहेत. उदाहरण सांगायचं झाल्यास जेव्हा आम्ही 2018 मध्ये पुन्हा चेन्नईचा संघ म्हणून आयपीएलमध्ये परतलो तेव्हा सरावासाठी आम्ही ओपन बसने प्रवास केला होता. त्यावेळी चाहते रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून रडत होते. त्यांना विश्वास बसत नव्हता की ते पुन्हा धोनीला सीएसकेच्या संघासाठी खेळताना पाहू शकतील," असं जडेजाने म्हटलं.

11/12

आयपीएलची सुरुवात चेन्नईसाठी फारशी चांगली राहिलेली नाही. पहिल्याच सामन्यात त्यांना गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला. मात्र सोमवारचा सामना चेन्नईने 12 धावांनी जिंकला. या सामन्यात शेवटच्या काही चेंडूंवर धोनीने तुफान फटकेबाजी करत दोन खणखणीत षटकार लगावले. 

12/12

चेन्नईने यंदाच्या पर्वात बेन स्ट्रोक्सला विकत घेतलं असून तोच धोनीची जागा भविष्यात घेईल अशी चर्चा आहे. यासंदर्भातील बातम्याही अनेक खेळ विषयक वेबसाईट्सने दिल्या आहेत.





Read More