PHOTOS

...म्हणून 'मुंबई इंडियन्स'ची धुरा रोहितऐवजी पंड्याकडे देण्याचा निर्णय 100% योग्य! जाणून घ्या 9 कारणं

How Hardik Pandya Is Better Than Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या संघाने इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वाच्या आधीच आपला कर्णधार बदलला. अचानक मुंबई इंडियन्सच्या संघाने हा निर्णय जाहीर केल्याने रोहित शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनीही यावरुन नाराजी व्यक्त केली. मात्र यासंदर्भात सविस्तर विचार केला तर पंड्या हा रोहितपेक्षा उत्तम पर्याय कसा ठरु शकतो ते पाहूयात...

Advertisement
1/13

हार्दिक पंड्याची रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी झालेली निवड योग्य आहे की अयोग्य यावरुन मतमतांतरे आहेत. मात्र मुंबई इंडियन्सच्या प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आजही क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत आहेत. मात्र खरंच या दोघांपैकी सरस कोण आहे आणि का? यावर नजर टाकूयात...

2/13

इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या पर्वाआधी मुंबई इंडियन्सच्या संघाने आपला मागील अनेक वर्षांपासूनचा कर्णधार बदलला.

 

3/13

रोहित शर्माला डच्चू देत मुंबई इंडियन्सचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं.

 

4/13

अनेकांनी रोहितला अशापद्धतीने बाजूला करुन हार्दिकला प्रमोट केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र पंड्याबद्दलच्या या निर्णयावर अनेकजण फारच वेगाने आणि विचार न करता व्यक्त झाल्यासारखं सविस्तर विचार केला तर वाटू शकतं. कसं ते पाहूयात..

 

5/13

इंडियन प्रिमिअर लीग 2024 च्या आगामी पर्वासाठी रोहितऐवजी हार्दिक पंड्या हा उत्तम पर्याय ठरु शकतो.

 

6/13

रोहित शर्मा मागील 10 वर्षांपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता.

 

7/13

नवीन चेहऱ्याला संधी देण्याची हीच योग्य वेळ असल्याने हार्दिक हा सध्या उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम आहे यात वाद नाही.

 

8/13

खेळाडू म्हणून हार्दिक पंड्याची सरासरी आणि स्ट्राइक रेट हा रोहित शर्मापेक्षा बराच उत्तम आहे.

 

9/13

मागील 3 आयपीएल पर्वांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाला रोहितच्या नेतृत्वात चमकदार कामगिरी करता आली नाही.

 

10/13

आता रोहितची जागा घेतल्यानंतर मागील 3 वर्षातील रेकॉर्ड अधिक सुधारण्याचा हार्दिकचा नक्कीच प्रयत्न असेल.

 

11/13

हार्दिक पंड्या हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. तो उत्तम फलंदाजी करतो. त्याची गोलंदाजी तर प्रभावशाली आहेच पण त्याचबरोबर तो उत्तम फिल्डरही आहे. कोणत्याही संघाला तो हवाहवासा वाटेल यात शंका नाही.

 

12/13

रोहित शर्मा या वर्षी 37 वर्षांचा होणार आहे. तर हार्दिक पंड्या 31 वर्षांचा आहे.

 

13/13

मुंबई इंडियन्सच्या संघाने भविष्याचा विचार करुन हार्दिककडे नेतृत्व सोपवलं असेल असं अनेक जाणकारांचं मत आहे. आता हे कितपत खरं आहे हे प्रत्यक्ष मैदानातच समजेल.

 





Read More