IPL 2024 Playoffs Schedule : गुवाहाटी येथे होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RR) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आलाय. दोन्ही संघांना एक एक गुण दिल्यानंतर आता प्लेऑफमधील शेडयुल फिक्स झालंय.
पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
पहिला क्वालिफायर सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 21 मे रोजी खेळवला जाईल.
तर एलिमिनेटर सामना हा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.
एलिमिनेटर सामना हा 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाईल.
तर क्वालिफायर वनमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात भिडतील.
दुसरा क्वालिफायर सामना बंगळुरूच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 24 मे रोजी हा सामना होईल.
तर आयपीएलचा फायनल सामना हा 26 मे रोजी बंगळुरूच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.