IPL 2024 SRH vs MI: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला अजून विजयाचा सूर गवसला नाही. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने एक चूक केली.
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने एक चूक केली.
हार्दिक पांड्याने केलेल्या चुकीची किंमत मुंबई इंडियन्सला सामना गमावून चुकवावी लागली.
हार्दिकने जसप्रीत बुमराहला केवळ चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याची संधी दिली. या ओव्हरमध्ये बुमराहने अप्रतिम कामगिरी केली.
दरम्यान असं असतानाही हार्दिकने बुमराहला 12 व्या ओव्हरपर्यंत गोलंदाजी दिली नाही.
13व्या ओव्हरपासून जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी आणलं. या सामन्यात तो मुंबई इंडियन्ससाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला.
बुमराहने 9 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली. यावेळी त्याने 4 ओव्हर्समध्ये केवळ 36 रन्स दिले.
बुमराह सोडून इतर सर्व गोलंदाजांची इकोनॉमी 11 पेक्षा जास्त होती. त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली असती तर चित्र काहीसं वेगळं असतं.