IPL 2024 Virat Kohli On Impact Player Rule : इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अनेक दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर आता विराट कोहलीने आपलं मत नोंदवलं आहे.
यंदाच्या हंगामापासून इम्पॅक्ट प्लेयर नियम लागू करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर हा नियम लागू करण्यात आला होता. त्यावर विराटने वक्तव्य केलंय.
मी रोहित शर्माच्या स्टेटमेंटच समर्थन करतो. मनोरंजन हा खेळाचा हेतू असला पाहिजे, असं विराट कोहली म्हणतो.
इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे ऑलराऊंडर खेळाडूंना तोटा होतो, असं वक्तव्य रोहित शर्माने केलं होतं.
कोणत्याही खेळात संतुलन असलं पाहिजे. फक्त मलाच नाही तर लोकांना देखील असंच वाटतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.
गोलंदाजांना प्रत्येक बॉल सिक्स आणि फोर जातोय, असं वाटतं. सामन्यात कोणा एकाचं वर्चस्व नसावं, असं विराटने म्हटलंय.
प्रत्येक संघाकडे बुमराह आणि राशिदसारखे गोलंदाज नसतात. मला आठवतंय जय भाई म्हणाले होते, आम्ही याचा रिव्ह्यू करू, असंही विराट यावेळी म्हणाला.
दरम्यान, इम्पॅक्ट खेळाडू अतिरिक्त खेळवत असल्याने ऑलराऊंडर खेळाडूंना संघात जास्त संधी मिळाली नाही, असं या हंगामात दिसून आलाय.