Records Broken By Vaibhav Suryavanshi: आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने सोमवारी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडलं. मात्र या सामन्यातील दमदार खेळीने विजय मिळवण्याबरोबरच वैभवच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेलेत. हे विक्रम कोणते ते पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर पाहूयात हे विक्रम आहेत तरी कोणते...
14 वर्षाच्या खेळाडूने केलेली कामगिरी त्याच्या वयाहून अधिक करिअर करणाऱ्या अनेक दिग्गजांनाही जमलेली नाही. वैभव सूर्यवंशीने आयपीएलमधील आपल्या तिसऱ्याच सामन्यात नेमके कोणकोणते विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतलेत त्यावर नजर टाकूयात...
राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात जायंट्सच्या संघांदरम्यान झालेला आयपीएलमधील 47 वा सामना राजस्थानच्या संघातील 14 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीनं गाजवला.
या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने दमदार विजय मिळवत स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. विशेष म्हणजे या विजयात राजस्थानच्या संघातील 14 वर्षांच्या वैभव सुर्यवंशीनं दमदार शकत झळकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यशस्वी जयस्वालनेही दमदार फटकेबाजी केली. या दोघांनी 166 धावांची सलामी दिल्याने राजस्थानच्या संघाला 210 धावांचं लक्ष्य सहज गाठता आलं. वैभवचा या सामन्यात सामनावीर ठरला.
सोमवारी मिळवलेल्या या विजयामुळे राजस्थानच्या संघ प्लेऑफ्सच्या स्पर्धेतून बाहेर जाण्यापासून थोडक्यात बचावला आहे. सध्या 17 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या आणि 35 बॉलमध्ये शतकी खेळी केली. या खेळीमध्ये वैभवने 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. या सामन्यात वैभवने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतले. हे विक्रम कोणते ते पाहूयात...
अवघ्या 35 बॉलमध्ये शतक झळकावत वैभव हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. आता त्याच्या पुढे केवळ ख्रिस गेल आहे. गेलने 2013 च्या पर्वात 30 बॉलमध्ये शतक झळकावलेलं.
वैभव हा आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय खेळाडू ठरला असून त्याने 15 वर्षांपूर्वीचा युसूफ पठाणचा विक्रम मोडीत काढला आहे. राजस्थानकडूनच खेळताना युसूफ पठाणने मुंबईविरुद्ध 37 चेंडूंमध्ये शतक झळकावलेलं. इतकं वेगवान शतक विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, ए. बी. डिव्हिलिअर्ससारख्या बड्या फलंदाजांनाही झळकावता आलेलं नाही.
टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा वैभव हा सर्वात तरुण खेळाडू ठपला आहे. वैभवने आपलं पहिलं टी-20 शतक हे 14 वर्ष आणि 32 दिवसांचा असताना झळकावलं असून त्याने विजय झोल या खेळाडूचा विक्रम मोडीत काढला आहे. 2018 मध्ये महाराष्ट्राकडून खेळताना विजयने 18 वर्ष 118 दिवसांचा असताना शतक झळकावलं होतं.
सर्वात तरुण वयात आयपीएलमध्ये अर्थशतक झळकावण्याचा विक्रम राजस्थानच्या तीन फलंदाजांच्या नावावर असून त्यात वैभवचा समावेश झाला आहे. यापूर्वी रियान परागने 17 वर्ष 175 दिवसांचा असताना 2019 मध्ये दिल्लीविरुद्ध अर्थशतक झळावलं होतं. त्यापूर्वी 2013 मध्ये संजू सॅमसनने 18 वर्ष 169 दिवसांचा असताना हा पराक्रम स्वत:च्या नावावर केलेला.
अंतरराष्ट्रीय सामना न खेळला आणि वेगवान अर्थशतक झळकावणारा खेळाडू होण्याचा मान वैभवने मिळवला आहे. त्याने अवघ्या 17 बॉलमध्ये अर्थशतक झळकावलं आहे. त्याने यशस्वी जयसवालचा विक्रम मोडीत काढला आहे यशस्वीने चेन्नईविरुद्ध अवघ्या 19 बॉलमध्ये अर्थशतक झळकावलं होतं.
वैभवने 11 षटकार लगावले असून कोणत्याही भारतीय फलंदाजाने एकाच खेळीत आयपीएल सामन्यात लगावलेले हे सर्वाधिक षटकार ठरलेत. त्याने मुरली विजयच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. मुरली विजयने 2010 मध्ये राजस्थानकडून खेळताना चेन्नईविरुद्धच्या सामन्यात 11 षटकार लगावले होते.
आयपीएलच्या आपल्या तिसऱ्याच सामन्यात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या वैभव सुर्यवंशीने शतक झळकावलं. कोणत्याही भारतीय फलंदाजाने पदार्पणानंतर शतक झळकावण्यासाठी घेतलेले हे सर्वात कमी सामने आहेत. यापूर्वी मनिष पांडे (2009), पॉल वथट्टी (2011) आणि प्रियांश आर्या (2025) या तिघांनी आपआपल्या चौथ्या सामन्यात शतक झळकावलं आहे.
101 धावांपैकी वैभवने 94 धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्यात. म्हणजेच त्याने 93.06 धावा या चौकार, षटकारातून आल्या आहेत. आयपीएलमधील कोणत्याही शतकवीरापेक्षा ही टक्केवारी जास्त आहे. असा विक्रम सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, ख्रिस गेल, सूर्यकुमार यादव, ए.बी. डिव्हिलिअर्ससारख्या दिग्गजांनाही जमलेला नाही.
वैभव आणि यशस्वी जयसवाल या दोघांनी 166 धावांची सलामीची पार्टनरशीप केली. ही राजस्थानसाठीची आयपीएलमधील सर्वात मोठी पार्टनरशीप ठरली आहे.