IPL 2025 Captains Salary Will Shock You: सर्वाधिक पगार घेणारा कर्णधार ऋषभ पंत असणार आहे. मात्र पंत आणि सर्वात कमी पगार घेणाऱ्या कर्णधाराच्या पगाराच्या रकमेमध्ये जमीन-आस्मानाचा फरक असेल. नेमका कोणाला किती पगार मिळणार पाहूयात...
यंदाच्या आयपीएलसाठी पंतला एका सामन्याला जेवढा पगार मिळणार आहे तेवढा एका कर्णधाराला संपूर्ण सिझनसाठी मिळणार आहे. सर्वाधिक पगार घेणार आणि सर्वात कमी पगार घेणारा 2025 च्या आयपीएलमधील कर्णधार कोण ते पाहूयात...
इंडियन प्रिमिअर लीगचं 18 वं पर्व 22 मार्चपासून सुरु होतं आहे. मेगा ऑक्शननंतर सर्वच संघाची रचना बदलली असून अनेक संघाचे कर्णधारही बदलले आहेत. अनेक संघानी अनपेक्षित चेहऱ्यांना कर्णधार म्हणून संधी दिली आहे.
यंदाच्या पर्वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आणि सर्वात कमी मानधन घेणाऱ्या कर्णधारामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही. सर्वाधिक मानधन कोणत्या संघाचा कर्णधार घेणार आणि कोणाला कर्णधार झाल्यानंतरही अगदीच कमी मानधन मिळणार हे पाहूयात...
ऋषभ पंतने दिल्लीच्या संघाचा निरोप घेतला असून तो या पर्वापासून लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. पंत हा यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार ठरणार आहे. यंदाच्या पर्वासाठी पंतला 27 कोटी रुपये मानधन मिळणार आहे.
मगील पर्वात कोलकात्याला तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या पर्वात पंजाब किंग्जच्या संघाचं नेतृत्व करणार आहे आयपीएलच्या 18 व्या पर्वासाठी श्रेयस अय्यरला तब्बल 26 कोटी 75 लाख रुपये मानधन मिळणार आहे.
पॅट कमिन्स मागील वर्षाप्रमाणे यंदाही सनरायझर्स हैदराबादच्या संघाचं नेतृत्व करताना दिसेल. पॅट कमिन्सला यंदाच्या पर्वासाठी 18 कोटी रुपयांचं मानधन मिळणार आहे.
ऋतुराज गायकवाड मागील पर्वाप्रमाणे यंदाही चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना दिसणार आहे. ऋतुराजला 18 कोटी रुपये मानधन यंदाच्या पर्वासाठी मिळणार आहे.
संजू सॅमसनच्या खांद्यावर राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्याला यासाठी 18 कोटींचं मानधन मिळणार आहे.
अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कर्णधार म्हणून यंदाचं पर्व खेळणाऱ्या अक्षरचं मानधन 16 कोटी 50 लाख रुपये इतकं आहे.
मागील पर्वापासून गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा शुभमन गिल यंदाही संघाचं नेतृ्त्व करणार आहे. शुभमनचं या पर्वाचं मानधन 16 कोटी 50 लाख रुपये इतकं आहे.
मुंबई इंडियन्सने 2024 च्या पर्वात नेतृत्व बदल करत हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवल्यानंतर त्यांना मोठा फटका बसला होता. मात्र यंदाच्या पर्वातही हार्दिककडे संघाने नेतृत्व सोपवलं असून त्याचं या वर्षीचं मानधन 16 कोटी 35 लाख रुपये इतकं आहे.
बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने अनपेक्षितरित्या रजत पाटीदारच्या खांद्यावर यंदाच्या पर्वात संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. रजतचं यंदाच्या पर्वाचं मानधन 11 कोटी रुपये इतकं आहे.
सर्वात कमी मानधन घेणारा आयपीएल 2025 च्या पर्वातील कर्णधार हा मराठमोळा आहे. या खेळाडूचं नाव आहे अजिंक्य रहाणे. अजिंक्य यंदा कोलकाता नाईट रायडर्सचं नेतृत्व करणार असून त्याला मानधन म्हणून अवघे दीड कोटी रुपये मिळणार आहेत. म्हणजेच पंतला 14 सामन्यांसाठी प्रत्येकी जवळपास दोन कोटी रुपये मिळणार असतानाच तेवढाच पगार रहाणेला संपूर्ण पर्वासाठी मिळणार आहे. (सर्व फोटो - आयपीएल)