PHOTOS

16 बॉलमध्ये 82 धावा... धोनीचा 21 वर्षांचा अनुभव 24 वर्षांच्या पोरासमोर फिका; CSK चा टप्प्यात कार्यक्रम

IPL 2025 CSK Vs PBKS 24 Year Old Batter: मंगळवारी झालेल्या या सामन्यात 24 वर्षीय तरुणाने अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करुन घेतले. या तरुणासमोर धोनीचं नियोजन सुद्धा फेल ठरलं...

Advertisement
1/10

एम. एस. धोनीचा 21 वर्षांचा अनुभवही या 24 वर्षीय पोरापुढे फिका पडला. नेमकं घडलं काय जाणून घ्या....

2/10

पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियंश आर्याने इंडियन प्रीमिअर लीगच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दमदार खेळी केली. त्याने केलेली कामगिरी अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली. एकीकडे पंजाबचे इतर फलंदाज केवळ हजेरी लावून परत जात असताना हा तरुण खेळडू मैदानात टिकून राहिला आणि त्याने दमदार शतक झळकावलं.

 

3/10

प्रियंश आर्याने चेन्नईविरुद्ध अवघ्या 39 चेंडूंमध्ये खणखणीत शतक झळावलं. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूने झळकावलेलं हे आयपीएलमधील दुसरं सर्वात वेगवान शतक आहे. यापूर्वी 2010 मध्ये यूसुफ पठाणने अवघ्या 37 चेंडूंमध्ये शतक झळावलं होतं. 

 

4/10

आर्यने झळकावलेलं शतक हे आयपीएलमधील चौथे सर्वात वेगवान आणि पंजाबकडून दुसरे सर्वात वेगवान शतक ठरलं.यापूर्वी डेव्हिड मिलरने 2013 मध्ये रॉयल चॅळेंजर्स बंगळुरुविरुद्ध 38 चेंडूंमध्ये शतक झळावलं होतं.

5/10

चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध आर्यचा स्ट्राइक रेट 310 चा होता. त्याने 20 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या. आयपीएलच्या सामन्यामध्ये किमान 20 चेंडूंमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेट केवळ दोन फलंदाजांचा राहिला आहे. 2014 किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध सुरेश रैनाने 348 चा होता. त्याचप्रमाणे मुंबई इंडियन्सविरुद्ध 2024 मध्ये जेक फ्रेजर-मॅकगर्कने 342.85 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केलेली.

6/10

चेन्नई विरुद्ध पाचवी विकेट पडल्यानंतर पंजाबच्या संघाने 136 धावा केल्या. आयपीएलमध्ये पाच विकेट पडल्यानंतर पहिल्या डावात कोणत्याही संघाने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. आयपीएलमध्ये कोणत्याही डावातील हा चौथा सर्वात मोठा स्कोअर ठरला आहे.

 

7/10

आपल्या या दमदार खेळीत आर्यने 7 चौकार आणि 9 षटकार लगावले. म्हणजेच त्याने षटकारातून 54 आणि चौकारामधून 28 धावा केल्या. याचाच अर्थ अवघ्या 16 बॉलमध्ये आर्यने 82 धावा चौकार-षटकाराच्या मदतीने केल्या. त्याने केवळ 21 धावा पळून काढल्या.

8/10

धोनीने केलेलं नियोजन या 24 वर्षीय पठ्ठ्याने एकहाती हाणून पाडल्याचं मंगळवारी दिसून आलं. हा सामना पंजाबने 18 धावांनी जिंकला.

 

9/10

आर्यच्या आधी दोन फलंदाज असे आहेत ज्यांनी टी-20 मध्ये अशा स्थितीत शतक झळकावलं आहे जेव्हा टॉप सहापैकी कोणीही दुहेरी धावसंख्येपर्यंत पोहचलेलं नाही. मायकर ब्रेसवेलने 2022 मध्ये वेलिंग्टनमध्ये सेंट्रल डिस्ट्रिक्ट्ससाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 141 नाबाद धावा केलेल्या. त्यावेळेस पहिल्या पाच फलंदाजांना एकूण पाच धावाही करता आल्या नव्हत्या.

10/10

साबेर जाखिलने 2021 मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध खेळताना बेल्जियमविरुद्ध 8 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना नाबाद 100 धावा केलेल्या. त्यावेळी अव्वल सात फलंदाजांनी चारपेक्षा कमी धावा करुन तंबूचा रस्ता पकडला होता. 

 





Read More