पीएल 2025 मधील 8 वा सामना शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी हे दोन्ही सं...
आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांनी त्यांचा पहिला सामना जिंकून नव्या सीजनची विजयी सुरुवात केली. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शुक्रवारी सीएसके विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना रंगणार असून सायंकाळी 7: 30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर अर्धातास अगोदर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक होईल.
पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी संघ हा प्रथम स्थानावर असून सीएसके संघ चौथ्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाचे पॉईंट्स टेबलमध्ये 4 पॉईंट होतील. तसेच जर आजच्या सामन्यात आरसीबी विजयी झाली तर ती प्रथम स्थानावर कायम राहील आणि जर सीएसके विजयी झाली तर ते पॉईंट्स टेबलमध्ये प्रथम स्थान काबीज करतील.
आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एकूण 33 सामने खेळवण्यात आले आहेत. यात चेन्नईचं पारडं जड राहिलं असून यात चेन्नई सुपरकिंग्स 21 वेळा तर आरसीबी 11 वेळा विजय झाली आहे. तर 1 सामना निर्णयाशिवाय राहिला. यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीचा सर्वोत्कृष्ट स्कोअर 218 धावा तर चेन्नईचा 226 धावा आहे.
आरसीबी विरुद्धच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्स त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये खूप बदल करणार नाही. यावेळी सीएसकेला त्यांच्या मिडल ऑर्डरकडून चांगल्या परफॉर्मन्सच्या अपेक्षा असतील. शिव दुबे, सॅम करन, दीपक हुडा हे मुंबई विरुद्ध सामन्यात चांगली कामगिरी करू शकले नव्हते. तेव्हा आरसीबी विरुद्ध त्यांची दमदार कामगिरी करून संघाला बळ द्यावं अशी अपेक्षा असतील.
सीएसकेचा स्टार गोलंदाज मथीशा पाथीरानाबाबत बोलायचं झालं तर त्याच्या फिटनेसवर अजूनही लक्ष दिले जात असून आरसीबी विरुद्ध सामन्यापर्यंत तो फिट होण्याची शक्यता नाही. चेन्नईच्या कोचने सुद्धा म्हटले कि त्याच्या उपलब्धतेबाबत अजून काही सांगता येत नाही.
चेन्नई सुपरकिंग्स संभाव्य प्लेईंग 11 : रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हूडा, शिवम दुबे, सॅम करन, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर) , आर अश्विन, नाथन एलिस, नूर अहमद, खलील अहमद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात कोलकाताचा पराभव केला होता. चेपॉकची पीच पाहता आरसीबी त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करू शकते. टीम डेव्हिडच्या ऐवजी जॅकब बेथल याचा समावेश करू शकतात. तसेच केकेआर विरुद्ध सामन्यात दुखापतग्रस्त असलेला भुवनेश्वर कुमार खेळू शकला नव्हता, परंतु सीएसके विरुद्ध सामन्यात प्लेईंग 11 मध्ये त्याची एंट्री होऊ शकते.
विराट कोहली, फिल साल्ट, रजत पाटीदार (कप्तान), देवदत्त पडिक्कल/मोहित राठी, लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेविड/ जॅकब बेथल, क्रुणाल पांड्या, रासिख सलाम/भुवनेश्वर कुमार/स्वप्निल सिंह, जॉश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा.
आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात सामना खेळवला गेला होता. या निर्णायक सामन्यात आरसीबीने बाजी मारली आणि सीएसकेचा पराभव करून ते प्लेऑफमध्ये क्वालिफाय झाले. परंतु या सामन्यात विजयानंतर आरसीबीने चेन्नई संघासमोर खूप अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केलं. तसेच सामना संपल्यावर आरसीबीचे खेळाडू सेलिब्रेशनमध्ये इतके व्यस्त होते की ते चेन्नईच्या खेळाडूंसोबत सामना संपल्यावर हस्तांदोलन करायचं सुद्धा विसरले. एम एस धोनीला ही कृती आवडली नाही आणि तो रागात ड्रेसिंग रूममध्ये आला. तसेच आरसीबीचा हा विजय त्यांच्या फॅन्सच्या इतक्या डोक्यात गेला होता की स्टेडियम बाहेर चेन्नईच्या काही फॅन्सना देखील आरसीबीच्या चाहत्यांनी डिवचलं. त्यानंतर सोशल मीडियावर सीएसकेच्या चाहत्यांनी आरसीबीच्या या कृतीचा बदला पुढच्या वर्षी नक्की घेतला जाणार असं म्हणत रान उठवलं होतं. त्यामुळे चेन्नई आणि आरसीबी या संघांमध्ये रायव्हलरी निर्माण झाली. तेव्हा चेन्नई सुपरकिंग्स आरसीबीकडून आयपीएल 2024 मधील पराभवाचा बदल घेण्यात यशस्वी होते का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.