PHOTOS

IPL 2025 Final जिंकणाऱ्या संघावर पडणार पैशांचा पाऊस; उपविजेताही होणार मालामाल; बक्षिसांची रक्कम...

IPL 2025 Final RCB vs PBKS Prize Money: आज होणाऱ्या फायनलनंतर विजेत्या संघाला किती पैसे दिले जाणार आहेत आणि उपविजेत्या संघाला किती पैसे दिले जातील जाणून घ्या...

Advertisement
1/9

विजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही एवढ्या मोठ्या रक्कमेचं बक्षीस आयपीएल ट्रॉफीबरोबर दिलं जाणार आहे. नेमकं विजेत्या आणि उपविजेत्या संघाला किती रक्कम दिली जणार हे पाहूयात...

2/9

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या म्हणजेच 18 व्या पर्वातील शेवटचा सामना पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांच्यात आज होणार आहे. अंतिम सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे.

 

3/9

या सामन्याबाबत अनेक खास गोष्टी आहेत. 2013 नंतर आयपीएलला पहिल्यांदाच एक नवा विजेता संघ मिळणार आहे. मुंबई इंडियन्सने (एमआय) त्यांचे पहिले विजेतेपद जिंकल्यानंतर अगदी मागील पर्वापर्यंत दरवेळेस पूर्वी जिंकलेल्या संघापैकीच एका संघाने चषकावर नाव कोरलं. यंदा मात्र नवा विजेता मिळणार आहे. 

 

4/9

मागील 18 वर्षांमध्ये आरसीबी किंवा पीबीकेएस दोघांनाही आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आरसीबीने तीनदा उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांना यापूर्वी अंतिम सामन्यात डेक्कन चार्जर्स (2009), चेन्नई सुपर किंग्ज (2011) आणि सनरायझर्स हैदराबाद (2016) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे.

 

5/9

पंजाबने यापूर्वी फक्त एकदाच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. 2014 च्या आयपीएल फायनलमध्ये कोलकात्याच्या संघाने पंजाबला पराभूत केले होते. तेव्हापासून, अगदी 2024 च्या पर्वापर्यंत पंजाबला कधीही प्लेऑफसाठी सुद्धा पात्र ठरता आलं नव्हतं.

 

6/9

दोन्ही संघांना आपलं पहिलं आयपीएल टायटल जिंकण्याची संधी असताना त्यांना जेतेपदाबरोबर मोठा आर्थिक लाभही होणार आहे. विजेता संघ कोट्याधीश होणार असून उपविजेत्यालाही घसघशीत रक्कम दिली जाणार आहे.

 

7/9

विजेत्या संघाला 20 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये मिळतील. 2022 सालापासून हीच रक्कम विजेत्या आणि उपविजेत्या संघांना दिली जाते.

 

8/9

खरं तर, आयपीएलच्या बक्षिस रकमेत मागील हंगामांपेक्षा सध्या लक्षणीय वाढ झाल्याचं दिसत आहे. 2008 साली स्पर्धेतील पहिल्या विजेत्या संघाला म्हणजेच शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या राजस्थान रॉयल्सला (आरआर) 4.8 कोटी रुपये बक्षिस म्हणून मिळालेले. उपविजेत्या चेन्नईच्या संघाला तेव्हा 2.4 कोटी रुपये मिळालेले.

 

9/9

सांघिक पुरस्कारांव्यतिरिक्त आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक सन्मान देखील दिले जातात. ज्यात स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आणि वर्षातील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्काराचा समावेश आहे.

 





Read More