Yuvraj Singh in IPL 2025 : गुजरात टायटन्सने (Gujarat titans) फार कमी वेळात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड नावावर केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने इतिहास रचला होता.
गुजरात टायटन्सच्या विजयात सर्वात मोठा वाटा होता तो हेड कोच आशिष नेहरा याचा… नेहरा आणि हार्दिकच्या जोडीने कमाल करून दाखवली होती.
अशातच आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी गुजरात टायटन्स सोडण्याची शक्यता आहे, अशी माहिती देखील समोर आलीये.
आशिष नेहराने गुजरातला सोडण्यावर नवा कोच कोण असेल? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता नवं नाव समोर आलंय.
कोचिंग स्टाफच्या भूमिकेसाठी गुजरात टायटन्स युवराज सिंगसोबत चर्चा करत असल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.
दरम्यान, युवराज सिंगने टीम इंडियासाठी दोन वर्ल्ड कप जिंकवून दिले आहेत. अशातच 30 आणि 31 जुलैला होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएल ओनर कोणते निर्णय घेतील यावर सर्वांचं लक्ष लागलंय.