IPL owners meeting with BCCI : मुंबईतील बीसीसीआयच्या बैठकीत आयपीएलचे मालक आणि बीसीसीआयचे अधिकारी यांच्यात बैठक 31 जुलै रोजी पार पडली.
या बैठकीत सर्व संघांच्या मालकांनी हजेरी लावली होती. शाहरूख खान अन् नेस वाडिया यांच्यात मतभेद झाल्याचं समोर आलं.
अशातच सनरायझर्स हैदराबादची मालकीन काव्या मारन देखील बैठकीला उपस्थित होती. त्यावेळी काव्याने काही मुद्दे स्पष्टपणे मांडले.
आयपीएलमध्ये कमीतकमी 7 खेळाडू रिटेन करता यायला हवे, असं स्पष्ट मत काव्या मारनने बैठकीत मांडलं आहे.
त्या 7 खेळाडूंपैकी परदेशात/भारतीय/अनकॅप्ड रिटेंशनवर मर्यादा नसावी, असंही काव्या मारनने यावेळी म्हटलं आहे.
आयपीएल लिलावात रिटेन्शन/RTM बद्दल खेळाडूंशी चर्चा करण्याचा पर्याय उपलब्ध असावा, अशी मोठी मागणी काव्या मारनने केली आहे.
त्याचबरोबर दरवर्षी लिलाव होतात मात्र, दर पाच वर्षांनी मेगा लिलाव पार पडावा, अशी मागणी देखील काव्या मारनने या बैठकीत केली आहे.
दरम्यान, आयपीएल मालकांच्या बैठकीला मुंबई इंडियन्सच्या मालकीन निता अंबानी यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली होती.