PHOTOS

पहिल्या 2 मॅचमध्येच गोएंकांचे 21 कोटी वसूल.. पंत नाही तर 'हा' खेळाडू चमकला; 12 बॉलमध्ये चोपल्या 60 धावा

्या पहिल्या दोन सामन्यानंतर लखनऊच्या संघासाठी सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पंतऐवजी अन्य एका खेळाडूनेच मालक संजीव गोएंकांचे पैसे ...

Advertisement
1/11

27 कोटी किंमत मोजलेल्या पंतपेक्षाही या खेळाडूने आयपीएल 2025 मध्ये लखनऊच्या संघासाठी उत्तम कामगिरी केली आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे पाहूयात...

2/11

इंडियन प्रिमिअर लीग 2025 च्या महालिलावामध्ये 27 कोटींची सर्वाधिक किंमत मोजून लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोएंका यांनी ऋषभ पंतला आपल्या संघात स्थान दिलं. मात्र पहिल्याच सामन्यापासून पंत त्याच्यासाठी जितकी रक्कम मोजण्यात आली त्याप्रमाणे कामगिरी करत नसल्याची टीका चाहत्यांकडून होताना दिसतेय. यासंदर्भात अनेक मिम्सही शेअर करण्यात आले आहेत.

 

3/11

एकीकडे पंतवर टीका होत असतानाच दुसरीकडे संजीव गोएंकांनी विश्वास दाखवलेल्या अन्य एका खेळाडूने मात्र त्यांचा विश्वास यंदाच्या पर्वातील पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये खरा ठरवला आहे. गुरुवारी (27 मार्च रोजी) सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात तर या खेळाडूच्या खेळीमुळेच हैदराबादला 5 विकेट्स आणि 23 चेंडू राखून विजय मिळवता आला.

 

4/11

ज्या खेळाडूबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे निकोलस पुरन! वेस्ट इंडिजच्या या धडाकेबाज फलंदाजासाठी गोएंकांनी लिलावामध्ये 21 कोटी रुपये मोजले. पहिल्या दोन सामन्यांमध्येच गोएंकांचे हे 21 कोटी वसूल झाल्याचं मत अनेक चाहत्यांनी पुरनचा खेळ पाहिल्यानंतर म्हटलं आहे.

 

5/11

हैदराबादच्या संघाने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना अडखळत सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरला माकरम बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या निकोलस पुरनने हैदराबादच्या गोलंदाजीची पिसं काढली. अवघ्या 8.3 ओव्हरमध्ये लखनऊचा संघ एक बाद 120 धावांवर पोहोचला. यामध्ये सर्वात मोठा वाटा निकोलस पुरनने केलेल्या फटकेबाजीचा राहिला.

 

6/11

निकोलस पुरनने अवघ्या 18 चेंडूंमध्ये दमदार अर्धशतक झळकावलं. यानंतरही तो तुफान फटकेबाजी करत होता. त्याची ही फलंदाजी पाहून स्वत: संजीव गोएंका यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.

 

7/11

निकोल पुरन हा हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात एलबीडब्ल्यू झाला. मात्र तोपर्यंत त्याने त्याचं काम पूर्ण केलं होतं आणि लखनऊचा संघ सहज विजयी होईल अशी संघाची स्थिती होती.

 

8/11

निकोलस पुरनने हैदाराबादविरुद्धच्या सामन्यात 26 चेंडूंमध्ये 70 धावा केल्या. यात त्याने 6 चौकार आणि 6 षटकार लगावले. म्हणजेच अवघ्या 12 चेंडूंमध्ये 60 धावा केल्या. तर उर्वरित 16 चेंडूंमध्ये त्याने 10 धावा केल्या. या खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 269 इतका होता. 

 

9/11

मागील पाच सामन्यांचा स्कोअर पाहिल्यास निकोलस पुरन किती जबदस्त फॉर्ममध्ये आहे याचा अंदाज येतो. मागील पाच सामन्यांत त्याने 48*(26), 61(27), 75(29), 75(30), 70(26) धावा केल्या आहेत. म्हणूनच यंदाच्या पर्वाच्या सुरुवातीच्या दोन सामन्यामध्येच गोएंकाचे पैसे वसूल झाल्याचं चाहते म्हणत आहेत.

 

10/11

निकोलस पुरनने लखनऊच्या संघासाठी आतापर्यंत 31 डावांमध्ये 1 हजार 2 धावा केल्या असून त्याची सरासरी 45.54 इतकी आहे. त्याचा स्ट्राइक रेट 184.53 इतका आहे. तो लखनऊच्या संघासाठीचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे.

11/11

सर्वाधिक धावा करणाऱ्या आयपीएलमधील यंदाच्या पर्वातील खेळाडूंमध्ये निकोलस पुरन आघाडीवर आहे. म्हणजेच तो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये सध्या पहिल्या स्थानी आहे.





Read More