MS Dhoni On Retirement : आयपीएल ऑक्शनपूर्वी बीसीसीआय प्लेयर्सच्या रिटेन्शनवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशातच चेन्नईचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीने मोठं वक्तव्य केलंय.
खेळाडू कायम ठेवण्याबाबत (रिटेन्शन) बीसीसीआय काय निर्णय घेतात? हे पाहावे लागेल. सध्या चेंडू आमच्या कोर्टात नाही, असं धोनी म्हणतो.
त्यामुळे एकदा का नियम आणि नियमांची औपचारिकता झाली की, मी कॉल घेईन पण संघाच्या हितासाठी असेल, असं म्हणत महेंद्रसिंग धोनीने सुचक वक्तव्य केलं आहे.
धोनीच्या या वक्तव्यामुळे आता महेंद्रसिंग धोनी आता नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी निवृत्ती जाहीर करणार का? असा सवाल विचारला जात आहे.
प्लेयर रिटेन्शनची संख्या जास्त असेल तर धोनी चेन्नईसाठी मैदानात उतरून खेळू शकतो. परंतू संख्या कमी असेल तर धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, पथिराना आणि रचिन रविंद्र यांना कायम ठेवण्याची शक्यता आहे.