PHOTOS

MI vs PBKS मॅच दरम्यान पावसाला सुरुवात! मॅच रद्द झाली तर कोणता संघ जाणार फायनलला? जाणून घ्या नियम

IPL 2025 Qualifier 2 : आयपीएल 2025 मध्ये 1 जून रोजी क्वालिफायर 2 सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. क्वालिफायर 2 चा विजेता संघ हा थेट 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत ट्रॉफी विजयासाठी फायनल सामना खेळेल. मात्र मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचा टॉस झाल्यावर पावसाने यात खोडा घातला त्यामुळे जो पर्यंत पाऊस थांबत नाही तोपर्यंत सामना सुरु होणार नाही. क्वालिफायर २ सामन्यावर पावसाचे सावट आहे. तेव्हा पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलसाठी क्वालिफायर करेल याबाबतचे नियम जाणून घेऊयात. 

Advertisement
1/8

मुंबई इंडियन्सचा संघ शुक्रवार 30 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव करून क्वालिफायर 2 सामन्यात पोहोचला आहे. आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. याच स्टेडियमवर 3 जून रोजी आयपीएल 2025 चा फायनल सामना सुद्धा पार पडेल. रविवारी क्वालिफायर 2 सामन्यापूर्वी पंजाब किंग्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी मुंबई इंडियन आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांनी क्वालिफायर 2 सामन्यासाठी प्लेईंग 11 मध्ये बदल केले आहेत. मात्र टॉसनंतर पावसाला सुरुवात झाली. 

2/8

सध्या देशाच्या विविध राज्यांमध्ये वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच जर मुंबई विरुद्ध पंजाब क्वालिफायर 2 सामन्यात पाऊस पडला आणि त्यामुळे सामना रद्द झाला तर कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल हे पाहणं महत्वाचं आहे. 

3/8

क्वालिफायर आणि एलिमिनिटर सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे क्वालिफायर 2 सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर त्यासाठी अतिरिक्त दोन तास दिले जातील. जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यात एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला तर ग्रुप राउंडमध्ये वरच्या स्थानावर असलेला संघ पुढच्या राउंडसाठी क्वालिफाय करेल. 

 

4/8

याचा अर्थ असा की जर क्वालिफायर 2 सामना पावसामुळे रद्द झाला तर चौथ्या क्रमांकांवर असणारा मुंबई इंडियन्सचा संघ स्पर्धेच्या बाहेर होईल. तर पंजाब किंग्स फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना एलिमिनेटर सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊच नये अशी प्रार्थना करावी लागेल.   

 

5/8

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल सामना होणार असून या सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 3 जून रोजी सामना झाला नाही तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. 

 

6/8

मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर 20 धावांनी विजय मिळवला. यात  मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाज करून गुजरातला  विजयासाठी 229 धावांचे आव्हान दिले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यात ते अयशस्वी ठरले. 

7/8

आयपीएलच्या 18 सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 11 वेळा प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं असून त्याने तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. 

8/8

पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांचा आयपीएलमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 32 सामने खेळवले गेले असून यात 17 सामने मुंबईने तर 15 सामने पंजाब किंग्सने जिंकले आहेत. 

 





Read More