PHOTOS

Virat Kohil Net Worth : क्रिकेट, व्यवसाय, कार, घरे आणि बरेच काही..! किंग कोहलीची एकूण संपत्ती किती?

Virat Kohil Net Worth : तब्बल 18 वर्षांनंतर पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore ) म्हणजेच आरसीबी (RCB) यांना आयपीएलचं जेतेपद मिळालं आहे. त्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली ती विराट कोहलीची...नेटकरी विराट कोहलीची संपत्तीदेखील गुगलवर सर्च मारत आहेत.

Advertisement
1/10

क्रिकेटचं मैदान गाजवणारा किंग कोहली त्याच्या व्यवसायतही खूप पुढे आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये त्याचं नाव आहे. 

2/10

विराट कोहली हा क्रिकेट, ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायातून चांगली कमाई करतो. त्याची एकूण संपत्ती ही 1050 कोटींच्या घरात आहे. 2024 मध्ये विराटने 66 कोटी रुपयांचा आगाऊ कर भरला होतो. जो सर्वाधिक कर भरणारा क्रिकेटपटू बनला होता. 

 

3/10

विराट कोहली स्माट गुंतवणूक आणि ब्रँड व्हॅल्यूमुळे आपली संपत्तीत वाढ करतो. सोशल मीडियाचाही वापर तो केवळ क्रिकेटबद्दल नाही तर व्यावसायिक गोष्टींसाठीही करतो. 

4/10

तो आणि अनुष्का एक आलिशान जीवनशैली जगतात. त्याच्याकडे महागडे घड्याळे, गाड्या आणि घर आहे. अनुष्कादेखील कोट्यधीश असून तिच्याकडे 306 कोटींची संपत्ती आहे. 

5/10

विराट दरवर्षी 7 कोटी रुपये कमावतो. त्याला कसोटीतून 15 लाख, वनडेमधून 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यातून  3 लाखांचं मानधन मिळतं. आयपीएलमध्ये त्याला प्रत्येक हंगामात 15-17 कोटी रुपये मिळतात. याचा अर्थ तो फक्त क्रिकेटमधून 25 कोटी कमवतो. 

6/10

 क्रिकेटशिवाय विराट प्यूमा, ऑडी, एमआरएफ, पेप्सी, मान्यवर, विवो आणि मंत्रा या मोठ्या ब्रँड्सची जाहीरात करतो. त्यासाठी त्याला प्रत्येक जाहिरातीसाठी 10 कोटींचं मानधन मिळतं. 

7/10

 तर विराटने ब्लू ट्राइब, जिम चेन चिसेल फिटनेस, डिजिट इन्शुरन्स, स्पोर्ट्स कॉन्व्हो आणि युनिव्हर्स स्पोर्ट्सबिझ इत्यादी अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. विराटचे मुंबईत वन8 कम्यून नावाचं रेस्टॉरंट आहे. 

8/10

विराटकडे एफसी गोवा, टेनिस आणि कुस्ती संघदेखील आहे. त्यातून त्याला मोठा फायदा होता. 

9/10

 मुंबईत वरळीमध्ये 34 कोटींचं अपार्टमेंट आहे. तर गुरुग्राममध्ये डीएलएफ फेज - 1 मध्ये त्यांचा एक आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत 80 कोटींपेक्षा जास्त आहे. 

10/10

मुंबई, गुरुग्रामशिवाय अलिबागमध्ये 30 कोटींपेक्षा महाग असा एक बंगला आहे. तर त्याच्याकडे बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, ऑडी आर8 एलएमएक्स, रेंज रोव्हर वोग, ऑडी क्यू8, ऑडी एस5 सारख्या आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. 

 





Read More