PHOTOS

Ferrari ते Rolls Royce, SRH च्या मालकिणीकडे लक्झरी गाड्यांचा ताफा, नेटवर्थ 4090000000 रुपये

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला दणक्यात सुरुवात झाली असून दररोज एकापेक्षा एक रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. आयपीएल 2024 मध्ये उपविजेता ठरलेल्या सनरायजर्स हैदराबादने त्यांच्या पहिल्याच सामन्यात 286 धावांचा स्कोअर उभा केला. तर या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 44 धावांनी विजय सुद्धा मिळवला. त्यामुळे हैदराबाद संघ आयपीएल 2025 च्या पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वर आहे.  सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हिची संपत्ती आणि कार कलेक्शन बद्दल जाणून घेऊयात.

 

Advertisement
1/7

सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन ही ऑक्शन टेबल असो किंवा मॅच दरम्यान स्टेडियमवर चिअर करणं असो प्रत्येकवेळा आपल्या संघाच्या पाठीशी भक्कपणे उभी राहताना दिसते. काव्या मारन ही हैदराबाद संघाची CEO असून ती 33 वर्षांची आहे. 

2/7

काव्या मारन हिचे वडील कलानिधी मारन हे सन ग्रुपचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. काव्या मारन हिने उच्च शिक्षण घेऊन वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. तसेच ब्रिटनच्या नामांकित युनिव्हर्सिटीमधून एमबीएची पदवी प्राप्त केली. 

3/7

शिक्षण घेतल्यावर काव्या मारन ही भारतात परतली तिने काही महिने वडिलांच्या कंपनीत ट्रेनिंग घेतले.  2019 मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये काव्या मारनचा समावेश करण्यात आला. सन म्युझिक आणि सन नेटवर्कच्या एफएम चॅनेलसाठीची जबाबदारी तिच्याकडेच आहे.

4/7

सनरायजर्स हैदराबादची मालकीण असणाऱ्या काव्या मारनची नेटवर्थ ही जवळपास 409 कोटी असल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. तर काव्याला वर्षाला जवळपास 1.09 कोटी रुपये इतका पगार मिळतो.

5/7

काव्या मारनकडे अनेक आलिशान आणि लग्झरी गाड्यांचं कार कलेक्शन आहे. काव्याकडे रोल्स रॉयस फॅंटम VIII EWB ही कार आहे. याची किंमत जवळपास भारतात 12.2 कोटी रुपये आहे. 

6/7

काव्या मारनकडे  6 कोटींची एसयूवी कार आहे. ज्यात 4.0-लीटर ट्विन-टर्बो V8 इंजन लावलेलं आहे. हैदराबाद संघाच्या मालकाकडे बव्हेरियन दिग्गजांचा बिल्ला असलेली कार देखील आहे. त्याच्याकडे ब्लॅक सॅफायर मेटॅलिक पेंट असलेली i7 कार आहे. ज्याची भारतात किंमत सुमारे 2.03 कोटी रुपये आहे.

7/7
फेरारी :
फेरारी :

काव्याच्या कार कलेक्शनमध्ये फेरारी रोमाचा सुद्धा समावेश आहे. या कारची किंमत सुमारे 3.76 कोटी आहे. यात 3.9-लीटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजन आहे. 





Read More