PHOTOS

बक्षीस की शिक्षा? वैभव सूर्यवंशीला मिळालेली 'ही' गोष्ट IPL 2029 पर्यंत त्याला वापरताही येणार नाही

IPL 2025 Vaibhav Suryavanshi Award: इंडियन प्रिमिअर लीगमधील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या वैभवला एक खास गोष्ट भेट देण्यात आली आहे. ही गोष्ट कोणी आणि ती त्याला पुढील चार वर्ष का वापरता येणार नाही हे पाहूयात...

Advertisement
1/11

यंदाच्या पर्वात चर्चेत राहिलेला वैभव सूर्यवंशी आयपीएल संपल्यानंतरही चर्चेत आलाय तो एका वेगळ्याच कारणामुळे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात...

2/11

राजस्थान रॉयल्सचा तरुण स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने त्याच्या आयुष्यातील पहिल्याच आयपीएल पर्वात भन्नाट कामगिरी केली. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने अनेक आक्रमक खेळी केल्या.

3/11

डावखुरा फलंदाज असलेल्या वैभवने 28 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 38 चेंडूंमध्ये 101 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 11 षटकार आणि सात चौकार लगावले होते. 

4/11

वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडूही ठरला. त्याने युसूफ पठाणचा विक्रम मोडीत काढला.

5/11

आयपीएलच्या पहिल्या हंगामात वैभवने एकूण सात सामने खेळले. यामध्ये त्याने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या. यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले.

 

6/11

वैभव सूर्यवंशीच्या शानदार कामगिरीसाठी त्याला सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आयपीएल फायनलनंतर हा पुरस्कार जाहीर झाला.

 

7/11

वैभव सूर्यवंशीला आयपीएल 2025 च्या हंगामातील 'सुपर स्ट्रायकर' पुरस्काराने कारची प्रतिकृती असलेली ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासह त्याला बक्षीस म्हणून त्याला खरीखुरी 'टाटा कर्व्ह' कार मिळाली.

 

8/11

आयपीएलमधील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या मूळच्या बिहारच्या असलेल्या वैभवने यंदाच्या हंगामात चमकदार कामगिरी केली आणि आता त्याला त्याचं बक्षीस मिळालं, अशी भावना चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वोत्तम स्ट्राइक रेट असल्याने वैभवला हा पुरस्कार देण्यात आला.

9/11

पुरस्काराची रक्कम म्हणून 10 लाख रुपये आणि टाटा कर्व्ह कार वैभवला देण्यात आली. विशेष म्हणजे, वैभवला ही गाडी चालवता येणार नाही. यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे तो अल्पवयीन आहे.

 

10/11

वैभव सध्या फक्त 14 वर्षांचा आहे आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नाही. त्याला ही कार चालवण्यासाठी अजून चार वर्ष वाट पहावी लागणार आहे. त्यामुळेच मिळालेली ही कार बक्षीस आहे की संयमाची परीक्षा पाहणी शिक्षा असा सवालही काही चाहत्यांनी उपस्थित केलाय.

 

11/11

वैभवचा जन्म 27 मार्च 2011 चा आहे. म्हणजेच त्याला मिळालेली कर्व्ह कार चालवण्यासाठी 2029 च्या जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे. त्यावेळी आयपीएलचं 22 वं पर्व सुरु असेल. कर्व्ह कारची किंमत 12 लाखांपासून 24 लाखांदरम्यान आहे.





Read More