आयपीएल २०१८ साठी लिलाव सुरु असताना अभिनेत्री प्रीती झिंटा खूपच उत्साहात दिसली. इतकचं नाही तर, या लिलावात प्रीतीने वाढवून बोली लावली. त्यामुळे खेळाडूंना मोठ्या किंमतीत खरेदीदारही मिळाले. (फोटो सौजन्य: IANS)
प्रीती झिंटाने पहिल्यांदा शिखर धवनवर मोठी बोली लावली. शेवटी धवनसाठी ५.२० कोटी रुपयांची बोली लावली. मात्र, आरटीएममुळे सनराइजर्स हैदराबादने त्याला रिटेन केलं. प्रीती लावत असलेली बोली पाहून वीरेंद्र सेहवागही स्वत:ला ट्विटरवर कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. "मुलींना शॉपिंगची आवड असते. प्रीती फुल ऑन शॉपिंग मूडमध्ये आहे. प्रत्येक गोष्ट खरेदी करायला हवी". (फोटो सौजन्य: IANS)
प्रीती झिंटाने दुसऱ्या बोलीत आर अश्विनला ७.६० कोटी रुपयांत खरेदी केलं. तर, पहिल्या दिवशी युवराज सिंगला दोन कोटी, करुण नायरला ५.६० कोटी, अॅरोन फिंचला ६.२० कोटी, केएल राहुलला ११ कोटी आणि डेव्हिड मिलरला ३ कोटी रुपयांत खरेदी केलं आहे. या संपूर्ण लिलावात प्रीतीची स्माईल तिच्या चेहऱ्यावर पहायला मिळत होती. (फोटो सौजन्य: IANS)
लिलावात अनेकदा प्रीतीला निराश व्हाव लागलं. सर्वाधिक बोली लावल्यानंतरही अनेक खेळाडू आरटीएममुळे तिला गमवावे लागले. यामध्ये शिखर धवनचाही समावेश होता. त्यावेळी प्रीतीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. यानंतर प्रीतीने म्हटलंही "आरटीएमचा मला राग येतो." (फोटो सौजन्य: IANS)
युवराजला खरेदी केल्यानंतर टीमची मालकीन असलेल्या प्रीतीला आपल्या भावना अनावर झाल्या. प्रीती झिंटाला आनंद गगनात मावेनासा झाला. तिने ट्विटरवरुन आपला आनंद व्यक्त केला. (फोटो सौजन्य: PTI)
आयपीएलच्या लिलावा दरम्यान आणि नंतर प्रीती आपल्या 'शॉपिंग'मुळे खूपच आनंदी असल्याचं पहायला मिळालं. यंदाच्या लिलावात प्रीतीला अनेक चांगले खेळाडू मिळाले. (फोटो सौजन्य: IANS)