PHOTOS

27 कोटींना विकत घेतलेल्या पंतच्या एका Run साठी गोएंकांनी किती रुपये मोजले? 'ही' रक्कम तुमच्या वार्षिक पगारपेक्षाही अधिक

r Each Run Scored By Rishabh Pant: पंतला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र त्याने केलेल्या धावांचा आणि त्याच्यासाठी मोजलेल्य...

Advertisement
1/11

27 कोटी रुपये देऊन संघात स्थान दिलेल्या ऋषभ पंतने शेवटचा सामना वगळता सुमार कामगिरी केली. मात्र पंतने केलेल्या धावा आणि त्याच्यासाठी मोजलेल्या पैशांचा हिशोब लावल्यास एक धाव किती रुपयांना पडली हे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. चला तर पाहूयात पंतच्या एका धावेसाठी संजीव गोएंकांनी किती रक्कम मोजली...

 

2/11

पंतचं या सामन्यातील सेलिब्रेशनही चर्चेत राहिलं. इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वातील लीग स्टेजमधील शेवटचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरला. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी धावांची टांकसाळ घातली. या सामन्यामध्ये 450 हून अधिक धावा झाल्या. दोन्ही संघांच्या गोलंदाजांची सुमार कामगिरी, आरसीबीला ऐनवेळी लाभलेली नशिबाची साथ, दोन्ही कर्णधारांची भन्नाट फटकेबाजी अशा अनेक गोष्टी या सामन्यात पाहायला मिळाल्या.

 

3/11

लीग स्टेजमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्सच्या संघांचा हा शेवटचा सामना होता. संपूर्ण पर्वामध्ये सातत्याने अपयशी ठरलेला लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतला शेवटच्या सामन्यात लय गवसल्याचं पाहायला मिळालं. मात्र सामन्याचा निकाल पाहिल्यास पंतची खेळी संघाच्या उपयोगाची ठरली नसली तरी ही खेळी खास होती.

 

4/11

लखनऊच्या संघाने 227 धावांचा डोंगर उभा केला. मात्र हा डोंगर आरसीबने 8 चेंडू आणि 6 विकेट्स राखून जिंकला. लखनऊच्या संघाच्या एकूण 227 धावांमध्ये सर्वाधिक योगदान कर्णधार पंतने दिलं.

 

5/11

ऋषभ पंतने लीग स्टेजमधील आपल्या शेवटच्या सामन्यात 61 बॉलमध्ये 118 धावा केल्या. यामध्ये पंतने 11 चौकार आणि 8 षटकार लगावले. म्हणजेच त्याने 98 धावा चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून अवघ्या 19 बॉलमध्ये केल्या.

 

6/11

पंतला लखनऊ संघाचे मालक संजीव गोएंका यांनी 27 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतलं होतं. पंतला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी संपूर्ण पर्वात करता आली नाही. शेवटचा सामना याला अपवाद ठरला.

 

7/11

पंतने शेवटच्या सामन्याआधी झालेल्या 13 सामन्यांमध्ये केवळ 151 धावा केलेल्या. मागील आठ पर्वांमध्ये पंतने सातत्याने 300 हून अधिक धावा केल्याने त्याच्यासाठी गोएंकांनी मोठी रक्कम मोजली.

 

8/11

मात्र यंदांच्या पर्वात शेवटच्या सामन्यातील 118 धावांची शतकी खेळी पकडून पंतला केवळ 269 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार म्हणूनही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही.

 

9/11

त्यामुळेच लखनऊसाठी हे पर्व संपलं असल्याने पंतची एक धाव गोएंकांना किती रुपयांना पडली याचा हिशोब चाहते मांडत आहे. 269 धावांसाठी गोएंकांनी 27 कोटी रुपये मोजले आहेत.

 

10/11

पंतसाठी मोजलेली रक्कम आणि त्याने केलेल्या धावा यांचा हिशोब केल्यास पंतची प्रत्येक धाव गोएंकांना 10 लाख 3 हजार रुपयांना पडली आहे. 

 

11/11

अनेकांनी पंतच्या एका धावेसाठी गोएंकांनी मोजलेली 10 लाख 3 हजार रुपये ही रक्कम कॉर्परेटमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातील व्यक्तींच्या वर्षाच्या पगाराएवढा म्हणजेच वार्षिक सीटीसीएवढा आहे.





Read More