BCCI Action On foreign players : आयपीएल संघांनी बीसीसीआयला हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.
आयपीएल ऑक्शनमध्ये बाजी मारलेल्या फ्रँचायझींना सिझनमध्ये यश मिळत नाही. त्याला कारण प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती..!
अनेक परदेशी खेळाडू आयपीएलच्या तोंडावर फ्रँचायझीकडून भलीमोठी रक्कम तर घेतात आणि राष्ट्रीय कर्तृत्वाचं नाव सांगून खेळत नाहीत.
अशा खेळाडूंवर कारवाई व्हावी, असं आयपीएल फ्रँचायझींचं म्हणणं आहे. क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत आहे.
हंगामातून शेवटच्या क्षणी माघार घेणाऱ्या परदेशी खेळाडूंवर कारवाई व्हावीस, अशी विनंती आयपीएल संघांनी बीसीसीआयला केली आहे.
दरम्यान, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, ॲडम झाम्पा, ॲलेक्स हेल्स, जेसन रॉय या खेळाडूंची पंचायत होण्याची शक्यता आहे.